काळे कुलवृत्तान्त

 

 

 

 

 

 



 वेब साईट बाबत...
श्री कालभैरवायनम:॥ श्री महासरस्वत्यैनम: ।

 

 

सन 1944 सालीं कै. कृष्णाजी केशव काळे यांनीं वत्सगोत्री काळे-जोशी-दाभोळकरांचा मिळून कुलवृत्तान्त प्रकाशीत केला. त्यानंतर सन 2003 सालीं मी कुलवृत्तान्ताची दुसरी आवृत्ती प्रकाशीत केली. परंतु सध्याचे हे युग संगणकीकरणाचे असल्यामुळें पुस्तकं सांभाळणे व हाताळणें कठीण झाले आहे आणि होणार आहे. तसेच प्रत्येक कुलबंधुंशी संपर्क साधून माहिती गोळा करून पुस्तक रुपाने कुलवृत्तांत छापणे कठीण गोष्ट झाली आहे व होणार आहे. सध्याच्या काळांत पत्रव्यवहार, निरोप पाठविणें वगैरे गोष्टी इतिहास जमा झाल्या आहेत.
सन 2003 सालची परिस्थिती नि आजची परिस्थिती यांत बराच फरक पडला आहे, आणि हा फरक दररोज पडत जाणार आहे, यांत शंकाच नाही. याचा सारासार विचार करून सन 2007 सालीं पुणें येथे भरविलेल्या आपल्या कुलसंमेलनांत आपली वेब साईट बनविण्याचा विषय मी मांडला होता. तेव्हां काहीं लोकांनी त्याला दुजोरा दिला होता. या बाबत सप्टेंबर, 2011 सालीं सर्व बंधूंना पत्रानें कळविले होते.
त्यानंतर आम्ही त्यावर विचार करून श्री. रवी ओक यांचे कडून माहिती मिळविली. ती फायदेशीर असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यावर कुलवृत्तान्त वेबसाईटवर प्रकाशीत करण्याचे ठरविले.
तेव्हां श्री. उदय काळे, निगडी, पुणें यांनी त्यांत सक्रिय भाग घेऊन कुलवृत्तांताची वेबसाईट बनविण्यासाठीं लागणार्‍या सॉफ्टवेअरची किंमत देऊन सॉफ्ट वेअर खरेदी करून देण्याची हमी दिली. त्यामुळें सॉफ्टवेअर खरेदी करून मी श्री. रवी ओक यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती भरण्यास सुरुवात केली. 
त्या प्रमाणे सन 2011 सालीं पुणें येथे भरविलेल्या कुलसंमेलनामध्ये कुलवृत्तान्ताच्या वेबसाईटचे प्रात्यक्षिक कुलबंधुना दाखविण्यांत आले. ते उपस्थित सर्व कुलबंधुंच्या पसंतीस उतरले. आणि आतां ते सर्व काम पूर्णत्वास गेले असून आपली आपल्या मालकीची वेबसाईट श्री. उदय काळे, निगडी, पुणें यांच्या औदार्याने kalekulvruttant.com म्हणूंन अस्तित्वांत आली आहे. 
या वेबसाईट पूर्ण होण्याच्या कामीं सौ. संगिता इंगळे (श्री. रवी ओक, यांच्या असिस्टंट) यांचीही फार मदत झाली आहे. तसेच या वेबसाईटचे वेबपेज (मुख्य पान) श्री. हितेंद्र जावळे यांनी बनवून दिले. तसेच काहीं कुलबंधूंनी वेब साईटसाठी येणार्‍या खर्चासाठीं मदत केली आहे. त्यांची यादी वेबसाईटवर हितचिंतक या सदरांत दर्शविलेली आहे.
जगांत कुठेही राहून (जेथे इंटरनेट उपलब्ध असेल तेथे) आपल्या कुलांतील व्यक्तींचा आपल्याला इतिहास वाचतां येतो व आपल्या वंशांतील व्यक्तींची नोंद करतां येते. कुलांतील व्यक्तींचा इतिहास पाहण्यासाठीं कुलवृत्तांत सोबत बाळगण्याची आतां गरज भासणार नाहीं. अथवा कुलवृत्तांत कधीं प्रसिद्ध होतो? याची वाट पहाण्याची गरज भासणार नाहीं. असे मला वाटते.
सर्वांनीं केलेल्या सहकार्या बद्दल सर्वांचे आभार मानतो. व सर्व कुलबंधु या वेबसाईटचा फायदा घेतील अशी अपेक्षा बाळगून कुलबंधुंना तशी सुबुद्धी देण्याची कुलस्वामींकडे प्रार्थना करतो.
लोभ असावा ही विनंती.

माझी प्रस्तावना (द्वितिय आवृत्ती-2003)

काळे कुलवृत्तांत नुतनीकरण करण्याची इच्छा उत्पन्न करून ती पूर्ण करून घेतल्या बद्दल कुलस्वामी आणि कुलस्वामिनीचा कृतज्ञ आहे.
काम सुरू केल्यापासून मनात एक प्रकारची भीती होती. काम पूर्ण होईल अथवा नाही ? परंतु जस जशी माहिती गोळा होऊ लागली आणि कुलबंधूंची थाप पाठीवर पडू लागली तस तसा नवा हुरूप येऊन आज पुर्णत्वास पोहोचत आहे.
कुलवृत्तांताची मूळ प्रत चि. विक्रम काळे, गिरगांव यांचेकडून मिळवून तिची झेरॉक्स प्रत काढून पाहिली तेव्हा माझ्या लक्षात आले की, गेल्या साठ वर्षांत कुलवृत्तांताचे नूतनीकरण कुणी केले नाही का? म्हणून जास्त चौकशी केली असता एक दोघांनी प्रयत्न केला असल्याचे समजले. कुलवृत्तांत नूतनीकरण करावयाचा मी निर्धार केला. त्याप्रमाणे एक विनंती पत्र छापून घेतले व नांदिवडे, ता. जयगड येथे जाऊन श्री. महादेव काळे यांचे सह श्रीकह्राटेश्वर आणि पंचायतनाला नमस्कार करून कामाला सुरूवात केली.
प्रथम वर वर सहज शक्य वाटणारे काम किती कठीण आहे, हे नंतर ध्यानात आले, कारण 1944 च्या कुलवृत्तांतात असलेली वसतिस्थाने/वास्तव्ये 60 वर्षांच्या प्रदीर्घ काळात बदलल्याचे आढळले. म्हणून ती शोधण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील निवडणूक कार्यालयांत जाऊन तेथील मतदार याद्या तालुक्याप्रमाणे काढून सध्या मूळ गावांत किती लोक रहातात त्यांची यादी बनविली. नंतर कुलवृत्तांतात दिलेले पत्ते शोधून साठ वर्षांनी व्यक्ती हयात असेल अशा व्यक्तींच्या नावे पत्रे लहून सोबत विनंती पत्र पाठविले. त्यातील बरीचशी पत्रे चुकीचा पत्ता, सापडत नाही, पत्ता बदलला वगैरे शेरे मारून पोस्ट खात्याकडून साभार परत आली. तर काही पत्रंही परत आली नाहीत अथवा ती पोहोचली की नाहीत तेही समजले नाही. परंतु ती ज्यांना ज्यांना पोहोचली त्यांतील कित्येकांनीं माहिती लगेच पाठवून आपल्या निकटवर्तीयांचे माहित असतील तेवढे पत्तेही पाठविले. परंतु तेवढ्यावर थांबून भागण्यासारखे नसल्यामुळे सर्व मूळ वसतिस्थानांना भेटी देऊन तेथे वास्तव्य करीत असलेल्या व्यक्तींकडून पत्ते मिळवून तसा संपर्क साधला. काही लोकांनी असलेली सर्व माहिती लगेच दिली, परंतु काहीनी पुष्कळ वेळा विनवण्या केल्यावर माहिती पाठविली.
सुरूवातीला तसं अद्यापही, कुलवृत्तांत पूर्ण करणं कठीण आहे असे वाटून साशंक भावनेतून माझ्याकडे पाहिले जात होते. तर काहीनी सरळ सरळ अविश्वास व्यक्त केला होता. काहींनीं तर आम्हाला माहितीच द्यावयाची नाही, असा सूर लावला. तसे 4/5 व्यक्तींनी अद्याप माहिती द्यायचीच नाही म्हणून दिलेलीही नाही. काहींनी पाठविलेली माहिती एवढी अपूर्ण होती की काही कशाचा बोध होत नव्हता, त्यामुळे त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करून अथवा फोन करून अपूर्ण माहिती मिळवावी लागली.
नागपूर, उज्जैन, इंदौर, भोपाळ, ग्वाल्हेर, वाराणशी आणि नाशिक इकडे एक दौरा काढून बऱ्याच व्यक्तींचे पत्ते शोधून त्यांची माहिती आणावी लागली. कारण काहींचे पत्ते शोधून काढून त्यांना फोन वरून अथवा पत्राद्वारे कल्पना देऊनही त्यानी माहिती पाठविण्यात वेळ घालविला. काहींना तर फॉर्म व्यवस्थित आटोपशीर केला असूनसुध्दा किचकट वाटला. त्यामुळे पाठविलेली माहिती संकलीत करताना पुन्हा पुन्हां फोन करून दुरुस्त करून घ्यावी लागली, त्यामुळे त्यांत काही चुकाही झाल्या असण्याची शक्यता आहे. त्या चुका होऊ नयेत म्हणून कसोशीने प्रयत्न केला आहेच.
काही व्यक्तींनी च्आपण माहिती मिळवून पाठवितोछ अशी आश्वासने दिलेली अद्यापही पाळलेली नाहीत. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे सन 1944 साली प्रसिध्द केलेल्या कुलवृत्तांताच्या पहिल्या आवृत्तीवेळीं आदरणीय कै. कृष्णाजी केशव काळे यांनी लहिलेल्या अडचणी तंतोतंत खऱ्या ठरल्या असेच म्हणावे लागेल.
पण सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, दि. 10-2-2001 पासून आत्तापर्यंत मी ज्या ज्या ठिकाणी कुलवृत्तांत घेऊन माहिती मिळविण्यासाठी ज्या ज्या कुलबंधूंकडे अथवा त्या संदर्भीत व्यक्तीकडे गेलो तो हिरमुसला होऊन कधीच परत आलो नाही, ही खरोखरच कुलस्वामी आणि कुलस्वामिनींची कृपा असावी यात शंका नाही.
काम पूर्ण होण्याच्या दृष्टीकोनांतून एक स्थानिक समिती गठीत करणे भाग पडले. वेळो वेळी उत्पन्न होणाऱ्या समस्यांचे निरसन करण्यासाठी, इतरांशी विचार विनिमय करणे, किंवा आर्थिक बाबींबाबत तातडीने निर्णय घेणे महत्त्वाचे असल्यामुळे समितीतील सभासद हे स्थानिक पातळीवरचे घ्यावयाचे निश्चित करून समिती गठीत केली. सदर समिती पुढील प्रमाणे असून समितीच्या विचाराने काम करण्यास सुरुवात केली. ती समिती या निवेदनात पुढे देत आहे. त्या समितीतील सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे.
कुलवृत्तांत नूतनीकरणाच्या कामात ज्या ज्या व्यक्तींचा हातभार हस्ते परहस्ते लागला त्या सर्वांचा मी ऋणी आहे. त्यामुळे ज्यानी ज्यानी उल्लेखनीय सहकार्य केले त्यांचा नामोल्लेख कार्यासह पुढे करत आहे.
श्री. रा. द. काळे, कुंदगोळ - यांनी स्वतः रत्नागिरीमध्ये दोन वेळा येऊन कामाची पहाणी करून दर महिन्याला एक पत्र लहून पुढे चालण्याची शक्ती दिली. एवढेच नव्हे तर त्यांनीं जानेवारी 2003 पासून न सांगता किंवा न मागता दरमहा रू. 500/- मदत म्हणून पाठविण्यास सुरुवात केली. कुलवृत्तांत नूतनीकरणाचे काम कोणत्याही परिस्थितीत थांबता नये असा आग्रह धरला. स्वतः काही लोकांच्या गाठी-भेटी घेऊन त्यांना माहिती पाठविण्यास उद्युक्त केले व माझ्या हुबळी-धारवाड दौऱ्यांत माझ्यासोबत माहिती मिळविण्यास मदत केली.
श्री. श्रीराम ल. काळे, नेरळ - त्यांना सांगण्यासारखे काम माझ्याकडे नसलेमुळे काहीं काम सांगू शकलो नाही. पण दरमहा एक पत्र लहून माझ्या कामाबाबत वेळोवेळी विचारणा केली. काही अडचण असल्यास सांगण्याची विनंती केली. मुंबईच्या दौऱ्यांत स्वतः येऊन माझी भेट घेतली.
श्री. प. ल. काळे, ठाणे - यांनी तर नेहमी फोन करून मला काम करण्याची चेतना दिली. त्यांना सांगितलेल्या व्यक्तींच्या गांठी-भेटी घेऊन माहिती ताबडतोब कळविली. श्री. सुरेश न. काळे, उंडील - यांनीं त्यांना सापडलेला मोल्ड माझेकडे देऊन फोटो घेण्यास सांगितले. तसेच माझ्या कामाची पहाणी करून काम पूर्ण करण्याबाबत आग्रह धरला.
श्री. सुभाष महादेव काळे, सातार्डा - यांनी माझे मागे लागून कुलस्वामिनीचे स्थळ शोधून काढण्याचा अट्टाहास धरला, त्यामुळे कुलवृत्तांत शोधण्याची इच्छा उत्पन्न होऊन कुलवृत्तांत नूतनीकरणाची कल्पना मनांत आली. यांनी स्वतः गोव्यामध्ये फिरून काळे कुलबंधूंची माहिती गोळा केली.
श्री. पुरुषोत्तम महादेव काळे, कोल्हापूर - यानीं स्वतः एक निवेदन काढून, टेलफोन डिरेक्टरीतील पत्त्यांप्रमाणे कोल्हापूर मधील सर्व काळे यांना ते पाठविले व वत्स गोत्री काळे यांना माहिती पाठविण्याचे आवाहन केले.
श्री. विष्णु दत्तात्रय काळे, सांगली - यांनी माझ्या सांगलीच्या दौऱ्यांत माझे सोबत दोन दिवस फिरून पत्ते शोधून काढले, आणि त्यांची माहिती मिळवून दिली.
श्री. मुकुंद विष्णु काळे, विश्रामबाग, सांगली - यानीं त्यांना ज्यांचे पत्ते पुरविले होते, त्या सर्वांकडे जाऊन माहिती पाठविण्याचे आवाहन केले.
श्री. निळकंठ केशव काळे, सातारा - यांनीं तर फार उल्लेखनिय कामगिरी केली आहे. त्यांच्या 80 वर्षांच्या वयात सुध्दा कुलवृत्तांत नूतनीकरणाचा केवढा उत्साह भरला आहे हे दाखवून दिले. माझे पत्र मिळाल्यावर आपल्या संपूर्ण घराण्यातील सर्वांना पत्र पाठवून त्यांचे जानेवारी 2002 मध्ये स्नेहसंमेलन बोलाविले. तसेच प्रत्येकाची माहिती स्वतः लहून अथवा त्यांचेकडून लहून घेऊन माझेकडे पाठविली. एवढेच नव्हे तर प्रत्येक गोष्ट मला पत्राने स्वतः लहून कळविली व माझे मनोधैर्य वाढविले. त्यांनीं आपल्या मुंबईच्या दौऱ्यात तसेच साताऱ्यांतील कुलबंधूंचे पत्ते व माहिती मिळवून माझ्यापर्यंत पाठविण्याचे काम केले आहे. त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत.
श्री. विठ्ठल पुरुषोत्तम काळे, पुणे - यांनीं स्वतः लोकसत्ता, पुणेे मध्ये निवेदन देऊन माहिती पाठविण्याची कुलबंधूंना विनंती केली. तसेच त्यांना जेवढे पत्ते कळविले होते त्यांच्याकडे जाऊन माहिती घेऊन पाठविली.
श्री. आनंदकुमार दत्तात्रेय काळे, पुणे - यांनी प्रथम निवेदनावर आपले नाव व पत्ता घालण्यास अनुमती दिली. त्यानंतर बऱ्याच व्यक्तींना आपले कडील फॉर्म पुरवून व त्यांचेकडे आलेली माहिती वेळोवेळी माझे पर्यंत पोहोचविली.
श्री. पुरुषोत्तम दत्तात्रेय काळे, गिरगांव, मुंबई - यांनीही प्रथम निवेदनावर आपले नाव व पत्ता घालण्यास अनुमती दिली. त्यानंतर बऱ्याच व्यक्तींना आपले कडील फॉर्म पुरवून व त्यांचेकडे आलेली माहिती वेळोवेळीं माझे पर्यंत पोहोचविली.
श्री. अशोक गोविंद काळे, नागपूर - नागपूर मधून ज्यांची माहिती आली नव्हती व ज्यांचे जुने पत्ते होते, त्या सर्वांकडे माझ्या नागपूर दौऱ्यात माझे सोबत सतत तीन दिवस फिरून माहिती मिळवून देण्याचे अमोल काम केले. तसेच इंदौर, उज्जैन आणि भोपाळ येथे माहिती मिळविण्यासाठी व्यवस्था केली.
श्री. जनार्दन दामोदर काळे, पुणे - यानी शारिरीक तंदुरुस्त नसताही इंदौर, उज्जैन आणि भोपाळ मध्ये मला फिरवून, तिकडे वर्षांनुवर्षें वास्तव्य असलेल्या कुलबंधूंनां शोधून, त्यांची माहिती मिळवून देण्याच्या कामात फार मदत केली. या शिवाय त्यांच्या घराण्यांतील माहित असलेल्या प्रत्येकाला स्वतः फॉर्म पाठवून माहिती पाठविण्यास सांगितले. तसेच काही लोकांना फोन करून माहिती पाठविली अथवा नाही याची विचारणा केली आणि माहिती पाठविणेस सांगितले.
श्री. माणिक अनंत काळे, पुणे - माझ्या पुणे येथील दौऱ्यांत प्रत्येक वेळी माझे सोबत येऊन संपूर्ण दिवस स्वतःच्या गाडीवरून फिरवून माहिती मिळविणेस मदत केली.
श्री. त्र्यंबक काळे, नागपूर - यांचेशीं संपर्क झालेवर स्वतः नागपूर येथील वर्तमान पत्रांतून वत्सगोत्री काळेबंधूना संपर्क साधण्याचे आवाहन करून आपली माहिती पाठविणेचे आवाहन केले.
श्री. अजय दिवाकर काळे, उज्जैन - यांचेशी संपर्क साधले पासून त्यांना ज्यांचे ज्यांचे पत्ते दिले त्यांचेशीं संपर्क साधून माहिती घेऊन पाठवून सहकार्य केले.
श्री. शशिकांत काळे, रत्नागिरी - आपल्या घरच्या पत्त्यावर कुलवृत्तांताची माहिती मागविण्यास परवानगी देऊन आलेले सर्व टपाल रोजच्या रोज माझे जवळ दिले. त्याच प्रमाणे तेथे येणाऱ्या सर्वांना माहिती पाठविण्याची विनंती केली. तसेच येणाऱ्या देणगी अथवा पुस्तक मूल्याची व्यवस्थित नोंद ठेवून वेळचे वेळी बँकेत जमा करण्याचे काम केले. तसेच वेळोवेळी मार्गदर्शन केले.
श्री. श्रीराम वि. काळे, पडेल - कुलवृत्तांत नूतनीकरण समितीची स्थापना करण्याची संकल्पना मांडून व सर्व सभासदांना निमंत्रित करून समिती स्थापन केली आणि समितीचा हिशेब पूर्ण लहून हिशेब तपासनीसांकडून त्याचा अहवाल घेऊन वेळोवेळीं सहकार्य केले.
श्री. विक्रम काळे, मुंबई - यांनी मूळ कुलवृत्तांन्ताच्या कोणतेही आढेवेढे न घेता त्याच्या झेरॉक्स प्रती काढण्यास अनुमती दिली.
श्री. अशोक शांताराम काळे, पुणे - यांनीं रत्नागिरीत आल्या पासून कुलवृत्तांत नूतनीकरणाच्या कामात हातभार लावला, तसेच वेळोवेळी सहकार्य केले. श्री.अरविंद दाभोळकर, इंदौर - यांनी दाभोळकर यांची सन 1865 सालची सनदेची कॉपी पाठवून काळे-दाभोळकर यांची माहिती स्वतः गोळा करून घेऊन पाठवून सहकार्य केले.
श्री. अरविंद वासुदेव काळे, मुंबई - यांनी त्यांनां कळविलेल्या पत्त्यांप्रमाणे व्यक्तींना गाठून त्यांची माहिती मिळवून पाठवून दिली. तसेच मला मुंबईतील काही पत्ते शोधण्यास मदत केली.
श्री. मिलिंद मोरेश्वर काळे, मुलुंड - यांनी कुलवृत्तांताच्या नूतनीकरणाच्या शेवटच्या कामाच्या वेळी रत्नागिरी येथे येऊन मला मदत केली.
श्री. मोरेश्वर वासुदेव काळे, मुलुंड - यांनी त्यांना माहित असलेल्या सर्व काळे कुलबंधूंची माहिती गोळा करून माझे जवळ पाठविली. तसेच बेळगांव येथे येऊन प्रुफ रिडींग करण्याच्या कामांत दोन दिवस मदत केली.
श्री. अनंत यशवंत काळे, डोंबिवली - यांनीं रत्नागिरी येथे येऊन कुलवृत्तांताच्या कामात थोडाफार हातभार लावला. तसेच डोंबिवलीतील लोकांची भेट घेऊन माहिती पाठविणेची विनंती केली.
श्री. अभिजित दत्तात्रेय काळे, ठाणे - यानीं कुलवृत्तान्ताचे मुखपृष्ठ तयार करून दिले.
सौ. प्रतिभा प्रकाश काळे, उपळें - यानीं माहिती मिळविणेंचे कामीं व वेळोवेळीं मदत केली.
श्री. परेश गोविंद काळे, रत्नागिरी - यांनी कॉम्प्युटरवर माहिती संकलनासाठी लागणारी पद्धत विकसित करून नूतनीकरणाच्या कामात मदत केली.
श्री. नारायण शंभू काळे, बेळगांव - यांनीं कुलवृत्तांताच्या मुद्रणाच्यावेळीं दोन दिवस मदत केली.
श्री. तुषार पुराणिक, सावंतवाडी - यांनीं आपला बहुमूल्य वेळ खर्च करून कुलवृत्तांताच्या नूतनीकरणाच्या कामात मदत केली. बेळगांव येथे माझ्या सोबत राहून प्रुफ तपासण्यांत मदत केली.
श्री. सुधीर जोगळेकर यांनीं आपल्या ओमेगा ऑफसेट प्रिंटर्स, बेळगांव येथे कुलवृत्तांताची छपाई करून वेळीच दिली म्हणून त्यांचा सहकाऱ्यांंचा व कर्मचाऱ्यांचा आभारी आहे. 
श्री त्र्यंबकेश्वर येथील उपाध्यायांनीं आपलेकडील नोंदी पहावयास दिल्या त्या बद्दल त्यांचा आभारी आहे. तसेच विनंतीस मान देऊन कुलवृत्तांताच्या नूतनीकरणासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केल्याबद्दल समिती तर्फे त्यांचे आभार मानतो.

वरील सर्व व्यक्तींनीं आणि ज्यांचे ज्यांचेशी थेट संपर्क आला त्या त्या व्यक्तींनी जे सहकार्य केले त्या बद्दल मी सर्वांचा फार आभारी आहे. आपले सहकार्यच मिळाले नसते तर हे कार्य माझे हातून घडले असते अथवा नाही या बद्दल काही निश्चिती देता येत नाही. पुन्हा एकदा सर्वांचे आभार मानूंन प्रस्तावना पूर्ण करतो.

(द्वितीय आवृत्ती बाबत)
सन 1944 साली प्रसिद्ध झालेल्या कुलवृत्तांताच्या प्रथम आवृत्तीत आणि आत्ताच्या आवृत्तीत थोडा फरक जाणवेल.  पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यांत फरक आहे.  पूर्वी कोकणात दळणवळणाची साधने अपुरी होती. काही ठिकाणी एका गावातून दुसऱ्या गावात जाताना पायवाटेने घनदाट अरण्यातून जावे लागत होते. कुठेतरी डोंगर कपारीत एखादे घर असे.  पावसाळ्यात तर पुष्कळ पंचाईत व्हायची.  तीन/चार महिने एका गावाचा दुसऱ्या गावाशी संपर्क येत नसे.  परंतु तेथील वस्ती अबाधीत होती.  या खेड्यांना जोडणारे मुख्य रस्ते यथातथाच होते. किंबहुना बैलगाडीनेच अथवा पायीं प्रवास करावा लागत असे.  त्यांत करून मुंबई सारख्या शहरात जावयाचे झाल्यास ओढे, नाले, नद्या पार करून समुद्र मार्गे बोटीने जावे लागत असे.  त्यामुळे या खेड्यांत रहाणाऱ्या लोकांना आपला उत्कर्ष साधण्यासाठी शहरे गाठणे भाग पडले.  एकदा शहराची हवा लागल्यावर पुन्हा कोकण नकोसे वाटू लागले. त्याचीच परिणिती म्हणजे आज रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मिळून सन 1944 च्या कुलवृत्तांतात दिलेल्या 57 घराण्यांतून आणि या द्वितीय आवृत्तीतील असलेल्या एकूण 62 घराण्यांपैकीं फक्त सुमारे 55 घरेच अस्तित्वात असून त्या मध्ये फक्त 250 ते 300 व्यक्तींचे वास्तव्य आहे.  पूर्वीच्या काळी शेती हाच मुख्य व्यवसाय होता.  आता शेती न करता उद्योगधंदे आणि नोकरी हेच प्रमुख व्यवसाय बनले आहेत.  त्यामुळें संपूर्ण देशभर किंबहुना जगभर वास्तव्ये झाली आहेत.  आत्ता शहर-गाव-वाडी असे रस्ते पक्के झाले आहेत.  बोटींचा प्रवास बंद झाला आहे.  फोन सुविधा झाल्या आहेत.  खेड्यापाड्यांतून वीज उपलब्ध झाली आहे.  संपर्क साधने वाढली आहेत.  वाडीतच अथवा गावात सर्व वस्तू मिळत आहेत.  दर दिवशी 2/3 वाहतूक गाड्या सुरू आहेत.  चालण्याचा त्रास कमी झाला आहे.  त्यामुळे काही लोक पुन्हा खेड्यांकडे वळत आहेत.
                    या आवृत्तीत पूर्वीची घराणी जशीच्या तशी दिली आहेत व सन 1944 नंतरची माहिती आजतागायत मिळाली त्या प्रमाणें अद्ययावत करण्याचा प्रयत्न केला आहे. काही घराण्यांचा म्हणजे घराणे क्रमांक 13,24,39,40 व 54 यांतील कोणत्याही व्यक्तीचा पत्ता न सापडल्या मुळे ती जशीच्या तशी अद्ययावत दिलीं आहेत.  काही घराण्यांतील एकाच व्यक्तीचा पत्ता सापडल्या मुळे त्यांची तेवढीच माहिती अद्ययावत केली आहे.  बाकी सर्वांची जशीच्या तशी ठेवली आहे.  पहिल्या आवृत्तीत मराठी पंचांगाप्रमाणे तारखा घेण्यात आल्या होत्या त्यात शक्य तेवढा बदल केला असून इसवी सनाप्रमाणे दिल्या आहेत.  मौंजी बंधनापूर्वीं मृत असलेल्यांची नावे दिली नव्हती परंतु जेवढी माहिती मिळाली त्या आधारे त्यांचीही नावे या आवृत्तीत समाविष्ट केली आहेत.
                    एकाच आडनावाची अनेक गोत्रे असल्यामुळें आणि बऱ्याच व्यक्तींनी आई, पत्नी, सून, आते, बहिणी, मुली, नाती वगैरेंची पूर्वीची व सध्याची गोत्रे न कळविल्यामुळे कोणत्या गोत्रांचे किती संबंध आले हे दाखविता आले नाही.  तसेच बऱ्याच व्यक्तींचे अथवा त्यांचे कुटुंबियांचे संबंध इतर जातींशी आले आहेत.  परंतु त्यांनी ते न कळविल्यामुळे एकूण आंतरजातीय विवाहाबाबत निश्चित काही लहिता आले नाही.  काही व्यक्तींच्या जन्म अथवा मृत तारखा त्रोटक दिल्या आहेत, तसेच वयेही कळविली नाहीत त्यामुळें साधारण तारतम्यतेने सदर व्यक्तीचे सध्याचे वय नमूद केले आहे.  त्यामुळे ती नमूद करताना चुका झाल्या असण्याची शक्यता वाटते.  काहींनी मुलांचे शिक्षण कळविताना स्पष्ट उल्लेख न केल्यामुळे शिक्षण किंवा पदव्या लहिताना चुका होण्याची शक्यता आहे.  काही व्यक्तींनीं अनेक भार्यांच्या संततींचा स्वतंत्रपणे उल्लेख केला नसल्यामुळे शक्य तेवढ्या तारतम्यतेने  त्यांची माहिती अंतर्भूत केली आहे.  काही व्यक्तींनी आपले बदललेले पत्ते कळविले नसल्यामुळे त्यांचे माहित असलेलेच पत्ते / वास्तव्ये नमूद केली आहेत.  तसेच हयात वडिलांचे वास्तव्य दर्शविण्या ऐवजी मुलाचे वास्तव्यात पत्ता नमूद केला आहे.  काही व्यक्तींनीं आपल्या पत्नीची, आईची अथवा मुलींची माहेरची नावे अथवा वडिलांचे व पतीचे संपूर्ण नाव न कळविल्यामुळे ती पूर्णपणे नमूद करणेत आलेली नाहीत.  मृत व्यक्तींचा मृत्यू दिनांक न कळविल्यामुळे फक्त मृत असे नमूद केले आहे. 
                    प्रथम आवृत्तीतील परिशिष्टे जशीच्या तशीं थोडी दुरूस्त करून कुलवृत्तांताच्या शेवटी दिली आहेत.  सन 1952 पर्यंत भारतातील सर्व संस्थाने भारत सरकारने खालसा केल्यामुळे पूर्वींच्या सनदा रद्दबातल केल्या असल्याचे समजते.  परंतु त्याचा योग्यतो पुरावा कुणी पाठविला नसल्यामुळे मिळणारे मानधन चालू असल्याचे नमूदकेले आहे.
ऐतिहासिक  कागदपत्रे (सन 1944 च्या आवृत्ती प्रमाणे)
  
या प्रकरणातील ऐतिहासिक कागद घराण्याप्रमाणे अनुक्रमाने दिले आहेत. पुढे दिलेल्या कागदांत ज्या व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांची नावे अकारादी क्रमाने दिलेली आहेत.  आणि त्या नावासमोर ज्या क्रमांकात ते नाव आले आहे तो क्रमांक दिला आहे.
                    व्यक्तीचे नाव                         क्रमांक                                             व्यक्तीचे नाव                         क्रमांक
                    कृष्णाजी बापूराव                     5                                                     रघुनाथ हरी                            2
                    कृष्णराव राम                        10                                                    रामराव  आपाजी                      9
                    जनार्दन नारायण                     8                                                     रामाजी अनंत                        11
                    नारायण जनार्दन                     7                                                     लक्ष्मण बल्लाळ                      1
                    बळवंत  वासुदेव                       6                                                     विश्वनाथ हरी                        12
                    बाळकृष्ण नारायण                  9                                                    सदाशिव हरी                            2
                    भैरव हरी                                13                                                   सुबाजी रामचंद्र                         3 व 4
                    अरविंद दाभोलकर                  14

[1] 
घराणे 7 वे, ऊपळें
श्रीराम
रावराजश्री दादोपंत दादा मराठे स्वामीस पो!! लक्ष्मण बल्लाळ काळे सा.नमस्कार विनंती विशेष येसाबा शेणवी याचा माार बाप बालाजी संभाजी पोतदार यास दापलग गुरव याने गावाचा हिशेब सरकारचा रोख ....विसी सांगितला होता त्याजवरून कुळकर्णी आपण म्हणोन कागदोपत्री लहो लागला. आलकडे तकलंग गुरव याचे कारकिर्दीत पहिले रिती पो!! बाळाजी संभाजी हाही त्याचे ममतेत होता पुढे नारो बल्लाळ व येसाजी बल्लाळ हे दोघे बाळाजी संभाजीचे मूळ यांणी वाणी यासी हाती धरून गांवात बखेडा केला खोतीची गुमस्तगिरी गुरव याजकडून आपण केली गुमस्ते गुरव याचे म्हणवितात परंतु गुरवाचे म्हणल्यात ते न चालत ते समई खोती त्याजकडील दूर करून आपले तर्फेने कोणासतरी द्यावी या उद्देशें गुरव याणे प्रयत्न फार केले अन्नाचा मोताद जाहला. लोकाचे देणे फार जाले. ते समई येऊन मौजे उपल्यास आमचे गळी पडला. त्याजवरून आम्ही मौजे ऊंडीलास गेलो तेथे श्रींचे देवालई सारे वाणी रयत यास बलाऊन आणिले आणखी त्यासी पुसीले जे गुरव खोती सर्व अधिकार कुळकर्ण सुद्धां आम्हांस देतो तुम्हास काय बोलावयाचे असेल तर बोला त्याजवरून त्यांणी सांगितले की आमचा बोलावयाचा अर्थ काहीं नाही तुम्हास देत असिला तर तुम्ही करा असे ते बोलल्यानंतर श्रीदेवीस पुसोन श्री काय सांगेल तैसे करुं म्हणोन आम्ही गुरवास सांगितले. त्याजवर त्याणे देवीस विनंती केली की मी तुझे सारे अधिकार आजवर चालविले मजखेरीज दुसरा वतनदार तुझे भुंके तांंबरा सुद्धा नाही. ऐसीयास गुरवकी सुद्धा लक्ष्मण बल्लाळ काळे याचे हवाली करितों.
हे तुझे चित्तास येते कीं काय त्यास आलें म्हणोन प्रसाद झाला त्याजवर आम्ही विनंती गुरव यास घालावयासी सांगितली कीं मी तुझा वतनदार हे वतन शेणवी व वाणी मला जिरोंं देत नाही म्हणोन संकटात पडिले हे संकट निवारण जाल्यावर  ***** माझे मुलाची वासना फिरेल तेव्हां मज साह्य होउन मज फिररोन हे वतन देसील कीं काय म्हणोन विनंती केली. देणार नाही म्हणोन सांगितलेंन. त्या पो!! हवाली वतन कर म्हणोन दुसरा प्रसाद जाला नंतर आम्ही देवीजवळ विनंती केली मला हातीं धरत्येस तर धरत्ये म्हणोन प्रसाद जाला.

[2] 
घराणे 8 वे,नांदिवडें
श.1713 ज्येष्ठ शु.12    श्रीगणपती    इ.स.1791 जून 13
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री सदाशिव कृष्ण जोशी स्वामी गोसावी यासी पो!! परशराम रामचंद्र नमस्कार विनंती उपरी येथील कुशल जाणुन स्वकीये कुशल लहित जाणे वो!! राजश्री सदाशिवभट व रघुनाथभट काले वास्तव्य मौजे नांदिवडे तर्फसेतवडें ता रत्नागिरी हे वैदिक  थोर सत्पात्र ....वछळ आहेत सबब यांस वरषासन सालीना.
    100 सदाशिवभट काले यास
    50 रघुनाथ भट
येकूण दोन आसामीस दीडशे रू.वर्षासन सरदेसगत मामले तोरगल पो!! सालमारी अवल सालापासून सरकारकून करार करून देउन तुमचे नावे सरकारची सनद आलाहिदा सादर जाहली आहे तर त्याप्रा!! उभयता भटजीस पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने सदरहु दीडशे रु!! वर्षासन दरसाल सरकार सनदेप्रमाणे पाववीत जाणे छ.10 सवाल सु!! इसने तिसैन मया व आलफ बहुत काय लहिणे ही विनंती.

[3] 

घराणें 15 वें नरेगल
Govt.seal
H.B.E.Frere
This sunud is issued on the part of Her Most  Gracious Majesty Victoria,Queen Of Great Britain and Irland and of the Colonies and Dependencies thereof,by Command and under the Signature of His Excellancy the Honourable Sir Henry Bartle Edward Frere Knight Commander of the Most Honourable Order of the Bath,Her MagestyÒs Governer of the Presidency of Bombay in Council, to the effect that -
Whereas in the Zilla of Dharwar certain Lands and cash Allowances are entered in the Government Accounts of the year 1863/64 as held on Service tenure, as follows:-
Name of Wutten                             Lands                        Cash                         Total Emoluments
                                                        assesed at                Allowances                after deductions
                                                                                                                         mamool joodee
Desai Karkoon                                34-0-0                        0-0-0                        34-0-0
Mahal Dambal of
said Taluka       
                    Note:-The details are given in the Maharatta below and whereas the holders thereof have agreed to pay Government a fixed annual payment in lieu of the service.
It is hereby declared that the said lands and Cash Allowances shall be continued herediteraly by the British Government on the following conditions! That is to say, that the said holders and their heirs shall continue faithful subjects of the British Government and shall render to the same the following fixed yearly dues:-
Mamool Joodee                                                            Rupees   
in lieu of service                                                                 0-0-0
                                                                                        12-12-0
                                                                                     ------------
                                                              Total Rupees      12-12-0
In considerations  of  the fulfilment of which conditions :-

1st:- The said Lands and cash Allowances shallbe continued without demand of the service and without increase of the Land Tax over the above fxed amount,and without objection or question on the part of Government as to the rights of any holders  thereof so long as any male heir to the wutten, lineal, collateral, or adopted within the limits of the Wuttendar family, shall be in existance.
2nd:- No Nuzzerana or other demand on the part of Government will be imposed on account of succession of the heirs, lineal, collateral or adopted wthin the limits of the Wuttender-family and permissions to make such adoptions  need not hereafter be obtained from Government.
3rd:- When all the sharers of the Wutten agree to request it, then general previlege of adopting at any time any person (without restriction as to family) who can be legally adopted, will be granted by Government to the Wutten, on the payment from that time forward in perpetuity of an annual Nuzzarana of one anna in each Rupee of the above total emoluments of the Wutten.
Dated at Bombay, this 13th day of April Eighteen Hundred and Sixty Four.

[4]
               
वर दिलेल्या सनदेतील मजकुराप्रमाणे आणखी एक सनद या घराण्यास याच तारखेची मिळाली आहे. सनदेतील आकडे निराळे असल्यामुळें तेवढाच मजकुर पुढें दिला आहे.

Name of Wutten                         Land  Assessed                  Cash Allowances                  Total Emoluments after deducting Mamool joodee
                                                    Rs.-a-p.                              Rs.-a-p.                              Rs.-a-p.
Desai Karkoon                             21-9-8                                   0-0-0                               21-9-8
Mahal Dambal                             219-8-0                                  0-0-0                              219-8-0
                                                          x                                          x                                       x
                                                          x                                          x                                       x
                                                          x                                          x                                       x
                                                                                                                      Rupees
Mamool joodee                                                                                                  0-0-0       
In lue of Service                                                                                                82-5-0

[5]
घराणे 44वे, अक्षी-नागांव
जागीरदार, दरकदार
                    कै.श्रीमंत सरकार माधवराव महाराज साहेब शिंदे अलिजाबहादुर यांनी ग्वाल्हेर स्टेटचे जागीरदारान याची हिस्ट्री तय्यार केल्यांत या घराण्याची हिस्ट्री पृष्ठ नंबर 559 व 560 संवत 1970 सन 1913 मध्ये दर्ज ती येणेप्रमाणे :-
                    हालात माधवराव मोरेश्वर गुरुजी इस खानदान के मूरीस कृष्णाजी बापुराव दाभोळकर काळे वएहद महाराजा महादजी साहाब यहां आकर ओहदे दफ्तरदारीपर मुकर्रर हुए और उनको जिले पुनामें एक गांव जागीरमे मिला.
                    बाद उनकी वफात के उनके लडके मोरो कृष्णने अपने बापकी जगहपर काम किया. व उनके कोई औलद नथी इसलिये उन्होने बळवंतराव को मुतवना किया, उसके बाद सुळबी औलद तीन बेटे हुबे इसतरह उन्होने चार लडके छोडे जिनके वुरसा अब हस्ब जेल  मोजुद है.
    (अ)    गणपतराव का एक लडका मोरेश्वरराव जिनके लडके माधवराव दफ़्तरदार हाल अपने बाप की जागह मौजुद है.
    (ब)    कृष्णरावने विनायकराव को वमंजुरी दरबार मुतवन्ना किया.
    (क)    रामराव जिनके लडके गंगाधरराव मौजुद है.
    (ड)    बलवंतराव (मुतवन्ना) के नारायणराव और उनके लडके जनार्दनपंत वुहभी हाल फोत होकर बेवा उनको मौजुद है.
अतियात
नकदी -
    (1)    तनखाह दरक दर्फदारी जो माधवराव को महक्मे इर्रेग्युलर फोर्स से मिलती है.  माहबार 175 रु. कलदार या सालना 2100 रु.
    (2)    इर्रेग्युलर फोर्ससे तनख्वाह विनयकराव कृष्णको रु.300 माहवार. (125 रु. बाबत दरख सिल्हेदारी व 175 रु.  बाबत दरक दफ्तरदारी) सालना 3600 रु.
    (3)    सीगेनकदी माफीसे बाबत तनख्वाह गंगाधर रामचंद्र रु.100 माहवार या सालना 1200 रु. कलदार.
    (4)    जेहद परवर्श बेवा जनार्दनपंत 96 रु.सालना. (सीगेनकदी माफीसे)
लवाजमा व मानमरातिब
    (1)    अफताबगीरी - सुर्ख मखमली मयझालर ताफता व दस्ता कामदार तिलई.
    (2)    पालखी - सुर्ख बनाती कामदार गोंडे निमजर्रीन फुदने रेशमी.
    (3)    घोडा - मयसामान नुकरे.
    (4)    म्याना - सादा
    (5)    छत्री -  सुर्ख
    (6)    चौरी - --
    (7)    छडी - चोबदार नुकरे.
    (8)    छडी - हलकारा सादा श्याम नुकरे व निशाण नाग व सुरज.
    (9)    छडी -जासूस सादा बालय श्याम नुकरे व निशाण नाग व सुरज.           
मानमरातिब
    (1)    नाशिस्त दरबार वरजाय मुकर्ररा हस्व फेहरिश्त दाश्ते दफ्तर मुत अल्लिका.
    (2)    तकरीबात मे सरकार वाडेपर तशरीफ फरमा होते है
    (3)    सरकारसे खिलअत पांच पांची आता होती है. तस्विक जामदार खाना (सं. 1929)
    (4)    अंदर वाडे सत्कारिके मय अरदलीके जाते है.
रस्ममातम
    (1)    दुखोटा दरबारसे जाता है.(तस्वीक जामदारखाना सं. 1933)
तेरीज
कुळ आमदानी रु. 6996.
फरायज
दरखदार साहब के फरायज वही है जो आमतोर पर तमहीद मे दर्ज है
शजरा खानदान माधवराव मोरेश्वर गुरुजी (वंशावळ)
                              बाबुराव
                                                                                                                                                         l
                                                                                                                                                 मोरेश्वरराव
                                                                                                      ----------------------------------------------------------------------------
                                                                                                     l                                          l                                          l                              l                             
                                                                                            गणपतराव                            कृष्णराव                              रामराव               बळवंतराव
                                                                                                     l                                          l                                          l                     गोद परगोत्री
                                                                                                     l                                          l                                          l                               l                       
                                                                                            मोरेश्वरराव                        विनायकराव                            गंगाधरराव               नारायणराव                   
                                                                                                     l                                   गोद आए                              गोद परगोत्री                   l  
                                                                 l-------------------------------l                                l                                          l                              l
                                                            माधवराव                       विनायकराव उर्फ             मोरेश्वरराव                            रामचंद्रराव                जनार्दनराव
                                                                                                  नारायणराव                        हयात                                   हयात                   राधाबाई बेवा         
                                                                                                  गोद गये                                                                                                      हयात

[ 6 ] घराणे 46 वे, मणचे - संगळ श्रीमंत सरकार संस्थान रामदुर्ग यांजकडून
सनद देणेत येते की मौजे संगळ संस्थान रामदुर्ग येथील काही जमिनी देवस्थान इनाम म्हणुन चालण्याचा दाव असुन त्या सन 1335 फसलीचे हिसेबी खाली लहिल्याप्रमाणे दाखल आहेत.
    जमीन ज्याचे नाव खर्चपडते त्याचे नांव                                                            शेत  नंबर                        क्षेत्र                आकार                    पैकी सरकारास येत आहे
                   
1    देवस्थानाचे नाव श्री संगमेश्वर देव                                                                        7                            24ए21                   57
2    मुळ संपादकाचे नाव - 
    1  बळवंत वासुदेव काळे
    2  गुंडो जिवाजी जोगळेकर                                                                                    60                            9ए19                    28
3    वहिवाटदाराचे नाव -
    1  गुंडो जिवाजी जोगळेकर
    2  बळवंत वासुदेव काळे                                                                                           2                                34                    85
                    सदरहु जमिनीबद्दल हल्ली असा ठराव करणेत येतो की, ती जमीन समरीसेटलमेंट ऍ़क्ट सन 1863 चा 2 रा कलम 8 ची रक्कम 2 री व 3 री व कलम 16 चे निशानव अन्वये श्रीसंगमेश्वर देव या देवस्थानाचे स्वास्थ्याकरितां पुढे लहिलेल्या शर्तीप्रमाणे जे कोणी मूळ संपादक व जे वडील शाखेचे वारस असतील याजकडे निरंतर चालविली जाईल त्या शर्ती अशा की.

शर्त पहिली - सदरहु उपभोग करणार याणी रामदुर्ग सरकारचे हुकुमात राहून इमाने इतबारे वागावे. व  रामदुर्ग सरकारास खाली लहिल्याप्रमाणे कायम रक्कम दरसाल देत जाव्या.
                                                                                            रु.            आ.            पै
    1)    मामुलजुडी                                                                  -                -            -
    2)    ठरलेली तरमाचे 1 रुपयास च्यार
        आणेप्रमाणे चौथाई जुडी                                                21                4            0
                                                              एकंदर रुपये            21                4            0
शर्त दुसरी  -  देवस्थानाची व्यवस्था वहिटदाराने योग्य रीतीने ठेवली पाहिजे.  तसे न होईल तर देवस्थानाची व्यवस्था सरकारचे इच्छेप्रमाणे केली जाईल.
शर्त 3 री - सदरी जमीन मूळ संपादकाच्या वंशपरंपरेची होईल आणि हाच हक्क त्यांचे पुरुष वारसास प्राप्त होईल. त्या कामी दत्तकाबद्दल तेढे वारसाबद्दल कसलीही तकरार सरकार मार्फत होणार नाही.  व नजराणा किंवा कर वर दर्शविल्या ठरीव जुडीपेक्षा अधिक जुडी घेतली जाणार नाही.
शर्त 4 री - सदरहु जमीनीची विक्री करण्यास, गहाण घालण्यास, किंवा बक्षीस देण्यास किंवा व्यवस्थापत्र करून देण्यास किंवा इतर कोणत्याही प्रकारे सदर देवस्थानाकडुन अथवा धर्मकृत्यांकडून काढून दुसऱ्या घरगुती रीतीने अथवा कोर्टाचे हुकुमा अन्वये व्यवस्था करून देण्यास उपभोग घेणाऱ्यास अधिकार नाही. मुंडा घेऊन म्हणजे अगाऊ खंड घेऊन जमीन लागण करणेची परवानगी नाही.  कारण देवस्थान इनामावर मालकी हक्क देवस्थानाचा आहे. वहिवाटदारचा नाही.
                    सदरहु बळवंत वासुदेव काळे - वर लहिलेल्या शर्तीवर सदरहु देणगी स्वीकारितो जाणिजे
                                                                                                                                                                                                                                              तारीख 28-3-1929
                                                                                                                                                                                                                                              सही - मराठी - बळवंत वासुदेव काळे
                    ही सनद श्रीमंत सरकार रामदुर्ग यांचे वतीने व त्याचे हुकुमावरून कलेक्टर संस्थान रामदुर्ग याचे सहीसिक्यानिसी तारीख 22 माहे अगटोबर सन 1928 रोजी तयार करण्यात आली आहे.
ही सनद सदरहु जमिनीचा हल्ली नोंदलेला वहिवाटदार बळवंत वासुदेव काळे - यांस दिली आहे. परंतु असे केल्याने इतर कोणाचे कायद्याप्रमाणे वाजवी हक्क असतील त्यास बाध येणार नाही असे समजावे.  ही सनद दिल्याबद्दल संस्थान रामदुर्ग येथील समरी सेटलमेंट प्रकरणी सनदांची नोंदणी आहे.  तिजमध्ये नंबर 109 यास दाखल लहुन ठेविला आहे व त्याजवर सदरहु बळवंत वासुदेव काळे याने सनद पावल्याबद्दल सही केली आहे.                         
                                                                                                                                                                                                                       संस्थान            (सही इंग्रजी)              ( सही इंग्रजी)    
                                                                                                                                                                                                                      रामदुर्ग               कारकुन              कलेक्टर संस्थान रामदुर्ग
 7 ] 
  घराणे 55 वे, हिंदळे
श. 1632 पौष शु. 3                                                                                                                                                                             सन 1710                 श्री
(शिक्का )
वे. शा. रा. नीळकंठ भट वझे धर्माधिकारी व नारायण ज्योतिषी कसबा आचरे स्वामी गोसावी यासी सेवक त्रिंबक गणेश सुभेदार प्रांत राजापुर नमस्कार सुरु सन अशरीन मया व अलफ वे. रा. बापुभट कुवळेकर वस्ती मौजे बेलणे बुद्रुक तुम्ही उभयता त्रिवर्ग हे धर्माधिकरी व ज्योतिष संबंधे कज्जा जाहला होता म्हणून त्रिवर्ग देवदुर्गीचे मुक्कामी मनसुबी बदल आलेत येथे  xxx  व चौघे गृहस्थ बसवुन मनसुबी करविली त्यावर समस्तानी मनसुबी यथान्याय निवडिली.
1    निळकंठ बिन रामभट वझे धर्माधिकारिणीपण पुरातन तर्फ साळसी या गावी चित्पावन असतील. त्यांचे घरचे धर्माधिकारीपण पुर्वापार नीळकंठभट तुमचे वडील हा काल पावेतो चालवीत गेले बापुभट यास संबंध नाही.
1    नारायण ज्योतिषी - तुमचे ज्योतिष तर्फ साळसी या गावी चित्पावन असतील त्यांचे घरचे ज्योतिषपण तुमचे वडील पुर्वीपासुन हा काल पावेतो चालवीत गेले.  दुसरे यासी चित्पावनचे घरचे ज्योतिषपणाशी संबंध नाही.
येणेप्रमाणे उभयतांचे धर्माधिकारण व ज्योतिषपणाचा निवाडा xxxx ग्रामस्तानी करून बापूभटाचे अलाहिदा पत्र तुम्हास करून दिले आहे. त्याप्रमाणे तर्फ मजकुरी जे गावी चित्पावन असतील त्या गावी त्यांचे घरी धर्माधिकारीपण व ज्योतिषपण तुम्ही उभयता चालवीत जाऊन उपभोग करीत जाणे  छ. 2 माहे रमजान मोर्तब असे.

[8]

श्री ( शिक्का )

 अजस्वारी रा. गंगाधर गोविंद सुभेदार विजयदुर्ग ताा. काादार मौजे कुणकेश्वर सुरु खमस समानीन मया व अलफ वे!!. रा. जनार्दन जोशी बिन नारायण जोशी घारकर वस्ती कसबा आचरे ता! मजकुर यानी सुभा जंजिरे मुक्कामी येऊन विदित केले की ता! मजकुर येथे ज्या गावी चित्तपावन ब्राह्मण राहतील त्यांचे घरची ज्योतिषपणाची वृत्त पुनरातन आपली आपणाकडे चालत असतां मौजे कुणकेश्वर ता! मजकुर येथील कृष्णंभट गोडबोले अग्निहोत्री आपले घरचे व आपले ठिकाणात बाहेरगावचे दोन ब्राह्मण ठेविले त्यांचे घरचे ज्योतिषपण 7-8 वर्षे धटाई करून सुरळीत देत नाही व बखेडा करितात त्यास आणून इनसाफ मनास आणावा आणि आपली वृत्त आपणाकडे पेशजीप्रमाणे चालती करावीत म्हणोन त्याजवरून गोडबोले यास सुभा आणून मनास आणिता लहोन त्यानी दिले की वृत्ति विषयी गावचे ग्रामोपाद्धे यांचे बोलणे आहे आपला कब्जा नाही 5-7 वर्षे वृत्त दिले नाही परंतु गावचे ग्रामोपाद्धे यांचा कज्जा नसल्यास सुरळीतपणे पेशजीप्रमाणे देतो. त्यावरून ग्रामोपाद्धे यांस बोलावून मनास आणिता चित्तपावनाचे घरची वृत्ती आमची नव्हे अग्निहोत्री आपणास बोलावित यामुळे 5-7 वर्षे त्यांचे घरी जाऊन ज्योतिषपण चालविले  ज्योतिषपणाविषयी आपला कज्जा नाही म्हणोत बे!! अंतोपाध्ये व xxxx पाध्ये बोंडाळे याणी पत्र लिहुन दिले आहे.  त्याजवरून ता! मजकुर ज्योतिषपणाची वृत्त चित्पावन यांचे घरची जनार्दन जोशी यांजकडे चालत आहे.  त्याप्रमाणे मौजे मजकुर येथील ज्योतिषपण चित्तपावन यांचे घरचे करार करून ज्योतिषापासून नजर 25 एकूण पंचवीस घेऊन ही सनद सादर केली असे तर मौजे मजकुरी चित्तपावनांची घरे असतील तर त्यांचे घरचे ज्योतिषपण जनार्दन जोशी यांजकडे सुरळीतपणे चालवणे कज्जामुळे गोडबोले खुद व गोडबोले यांचे ठिकाणात सुखवस्तु ब्राह्मण आहेत. त्याचे घरचे ज्योतिषपणाचा विषय अनामत आहे तो जोशी यांजकडे देवविणे. या सनदेची प्रत लहोन घेऊन असल सनद भोगवट्यासाठी परतोन जोशी याजकडे देणे जाणिजे छ.19 माहे रजब मोर्तब सुद. 
[ 9 ]
घराणे 56 वे, दाभोळकर
श्री
पुरावा नंबर 15453
तारीख 5 जुलई सन 1820 इसवीचे दफाते बारनिशिचा उतारा विजयसिंग कमाविसदार पाो. आंबड. 
(1)    दरविक रामराव आपाजी व बाळकृष्ण नारायण दाभुळकर वा पुणे याजकडील सदाशिव अनंत पेंडसे कारकून याणी हुजूर येऊन जाहीर केले की आपले यजमानाचे आजे रामाजी अनंत दाभोळकर यांस श्रीमंत बाळाजी बाजीराव प्रधान यांनी मौजे नवगाव  पो!.आंबड हा गाव करार करून देऊन मारनिल्हेचे नावे सनदा करून दिल्या त्या बा! सनदा.
(1)    प्रत सनद की मौजे मजकुर येथील मोंगलाई आमल चालत आला आहे त्याप्रमाणे ईनाम तुम्ही व तुमचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने अनुभव घेऊन सुखरूप राहणे म्हणोन सन सलास खमसेन मया व अलफ छ. 25 माहे रबिलावलची सनद.
(1)    प्रत सनद की मौजे मजकुर येथील मोंगलाई आमल पूर्वी दिला आहे. हली बाबती, सरदेशमुख व मोकासा दिला आहे. तरी पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने अनुभवून सुखरूप राहणे म्हणोन समान खमसेन मया व अलफ  छ 15 जमादिलावरची सनद.
(2)    एकूण सनदा दोन भोगवट्यास करून देऊन गाव इनाम दिला आहे येकसहा ज्यारी चालत आहे त्या बमोजीब चालविला पाहिजे म्हणोन सनदा दाखविल्या त्यावरून हुकुम केला. जातो जे मौजे मजकुर हा गाव दरोबस्त सदरहूप्रमाणे येकसा ज्यारी चालत आल्याची दर्याफ्ती करून ज्यारी असणेचे तपकीक असले तरी हली वारसदार असतील त्याजकडे मामुलप्रमाणे चालविणे आणि कैफियत मारुज करणे जाणिजे ता. 5 जुलई सन 1820 
सदाशिव पेंडसे नि!! दाभोळकर.                                                                                                                                                                                               
[ 10 ]
नेमणूक नंबर 103,श.1773,चैत्र व. 6
इ.स.1851, एप्रिल 21.
कृष्णराव राम दाभोळकर
 साहेब मेहरबान दोस्तान कृष्णराव राम दाभोळकर जहागीरदार वा! कसबे अकूळनेर जि. अहदमदनगर xxx
                    आजतर्फ कमिशनवर हरदु सरकार बारो.हेन. बार्ट यलस साहेब व चितांबरराव मनसबदार सलाम व नमस्कार दिगर आपण येऊन समजाविले की आंबड परगण्यातील मौजे नवगाव जहागीर व चौथाई सरदेशमुखीसुद्धा दरोबस्त गाव पेशवे सरकारातून आपणास इनामी आहे तो मंजूर होऊन पुढेही चालविण्याविषयी आज्ञा व्हावी म्हणोन त्यास पुण्याचे फेरिस्तात आपले तीर्थरूप रामराव आपाजी दाभोळकर यांचे नाव दाखल आहे.  यास्तव चौकशी चालविली. त्यातील सर्व मनास आणिता बाळाजी बाजीराव प्रधान पेशवे यांचे सनदेच्या नकला रेसिडेंट साहेब बहादूर यांचे सहीच्या आपण आणून दाखविल्या व पेशवे दफ्तरचे दाखले पुण्याहून आणविले. त्याजवरून मौजे नवगाव परगणे आंबड येथील जहागीर अमल सलास खमसेन मया व आलफ (शक 1674,सन 1752) साली व मोकासा बाबती सरदेशमुखी मिळोन दरोबस्त स्वराज्य आमल समान खमसेन, मया अलफ (श.1679,सन 1757) साली इनाम देऊन सनदा करून दिल्या त्याप्रमाणे अखेरपर्यंत आपले वडीलांकडे आविछिन भोगवटा चालत आल्याचे साबूत होते व कंपनी सरकारचा आमल झाल्यावर पाटेंजर सो!! बहादुर याणी चालत आल्याप्रमाणे  गाव चालविणेविषयी करार करून सोडचिठी दिलेली दाखल आहे या सर्व कारणांवरून मौजे नवगाव प्रगणे आंबड हा गाव जाहगीर व मोकासा बाबती सरदेशमुखी सु!! दुतर्फा आमल दरोबस्त कुलबाब कुलकानू हल्ली पट्टी पेस्तर पट्टी  खेरीज हक्कदार व कदीम ईनामदार करून जल तरु पाशाण आदि करून दरोबस्त गाव आवल संपादक रामाजी अनंत दाभोळकर यांचे उभयता पुत्रांचे पेशवे सरकारचे हुकमाने जाहलेले दत्तक रामराव आपाजी व नारो व्यंकटेश  यांचे अवलादीकडे वंशपरंपरेने चालविण्याचा करार करून ही सनद सादर केली असे तरि मौजे मा! आपले दुमाला आहे तो सदरहुप्रमाणे आपण भाऊबंध हिसेदार सु!! पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम आनुभऊन सुखरूप राहवे. कळावे ता. 21 माहे एप्रिल सन 1851 इसवी मुदाबक छ 18 जमादिलाखर फसली सन 1260 हिजरी सन 1267 मुकास खुलताबाद हे किताबात 

[ 11 ]  

मोहोर

बादशहा महमद अहमदशहा बहादुर फिरोझजंग फीदवी बादशाही गाझी गाझिउद्दीनखान निझाम उल्मुल्क बहादुरबक्षी उल्लमालक अमीरुल उमरा गाझी सन 1164 हिजरी.
ब देशमुखान व देशपांडियान व मुकदमान व मजारुआन परगणे आंबड सुभे खुजिस्तेकुनियाद नरिश्ठा मी बरदके मौजे नवगाव अमला परगणे मजकुर बतरीक इनाम आलतमशा बनाम रामाजी अनंत बा फर्झिदान मरहमत शूद बायदके मौजे मजकुरा दरतसर्रुफा मशारनिल्हे वागुजास्ता बवझे मजाहम नसवद व बरजाबवाब फौजदारी व अमानत व शेकेदारी व कोतवाली व फ़र्मायषात व जहागीरात वगैरा कुल आबबाब मशारनिल्हेरा मुत्तेसर्फं व दखीलेदारंद व बतनंद बादेबतनं फर्झिदाने व अवलादे नामे बुर्दा बहाल व मुकर्र व शनासन व सनद मुजदिद व तलवंद के हासिलात आनरासर्फे मॉयेताज खूदनमूदा बदुआए दौलत आबद मुदत परवाजंद दरीने बाब ताकीदे आकिद दानिस्ता 
हझबुल मस्तूर बआमल आरंद गुरेशाबान उल्मुआजम सन 1165 हिजरी कलमिषूद.

मोहोर
                    बादशहा महंमद अहमदशहा याचा देशमूख व देशपांडे मुकदम व शेते करणार व तमाम रयत सर्व अधिकारी लेखक वर्तमान व भावी यांस ताकीद देऊन कळविण्यात येते की परगणे आंंबड सुभा स्वराज्य पैकी मौजे नवगांव परगणे मजकुर हे गांव रामाजी अनंत यांस इनामआल्‌तमगा दरोबस्त मशारनिल्हेस कुलबाब फौजदारी अमानत शेकेदारी कोतवाली फर्मायषात जहागीरांत वगैरे कुलबाब कुलकानू जलतरुकाष्टपाषाण निधिनिक्षेप हलीपट्टी पेस्तरपट्टी दरोबस्त गांव पुत्रपाौत्रादि वंशपरंपरेने यावच्चंद्रदिवाकरौ रामाजी अनंत यांस बहाल व मुकरर करून इनाम दिली आहे. तरी कुणीही कशाही प्रकारे हरकत करूं नये व नवीन सनदेचा आक्षेप घेऊं नये. ही सनद स्वतः सर्फराजीनें स्वदस्तूरने लहून दिली असे सन 1165 हिजरी शाबान 1.
    वरील  मधली सनद मौजे नवगावची आहे. बाजूस दिलेल्या दोन सनदा कसबे अकोळनेर जिल्हा अहमदनगर आणि कसबे सुनाई व खेडलेपरमानंद, परगणे नेवासें, जिल्हा अहमदनगर या गावाच्या आहेत. गांवाच्या नावाशिवाय सर्व सनदातील मजकुर एकच आहे.
[ 14 ]
पुढील दस्तऐवज श्री. अरविंद दाभोळकर (घराणे 56 ) यांचे कडून प्राप्त झाली असून ती पुढे दिली आहे.
  A brief history of the Dabholakar Jagirdar Family of the Ahmednagar Collectorate (presented to the Agent for Sirdars in the Deccan, Poona ;  for incorporation in the Bombay Gazetteer) compiled by Rao Saheb Moro Krishna Dabholakar Jagiradar of Akolner, &c., Sirdar of the Deccan, Pleader - District Court Ahmedanagar, and Honorary sub-Judge and Magistrate.
                    The founder of the house of the Dabholkar family was Ramji Anant whose original surname was Kale, but the family was known as Dabholkar from the time of his ancestors. Ramji Anant was a native of Basani in Southern Konkan near Ratnagiri.  His grandfather Naro Krishna who was a Daftardar to His Highness the Sindhia, died at basani leaving a son Anant Narayan.  Anant Narayan died while his two sons were minors. The elder of them was Hari Anant and the younger Ramji Anant. Hari Anant died sonless.
                    The times of successors of Shivaji being stirring times, Ramji Anant was naturally inclined to seek his fortune abroad and consequently went to Satara, the centre of Maratha activity and glory. The reinging prince of Satara was Shahu. At Satara Ramaji Anant succeed in securing employment at the house of Janardan Baba Fadnis (the father of Nana Fadnis). After a time he was introduced to the Peshwa Balaji Bajirao who then ruled the destinies of Maratha world. Seeing the great abilities of Ramajipant the Peshawa sent him to Lashkar (Gwalior) as Diwan *to succeed a Ramachandra Malhar of the Shenavi caste, who was not on good terms with Jayappa Sindhia, the then ruling Sindhia.
                    The date of the birth of Ramajipant is not known.  He died at the battle of Panipat in 1761,  when Sadashiva Rao Bhau, the brother of the then peshwa fell.
It appears from the records that Ramaji Anant served as Divan and Fadanis to the Sindhia, since Ramachandra Malhar`s dismissal to the date of the battle of Panipat.  The period of his services as Divan extended for about 15 years during which three successors of the Sindhia family ruled viz, Jayappa, Dattaji (Jayappa`s brother) and Jankoji (Jayappa`s son).
                    Ramaji Anant received as personal salary Rs. 110 from the Peshwa and Rs. 600 from Sindhia.  Besides this the Bithoor Paragana yielding annually Rs. 1,20,000 was granted to him as Saranjam Jagir for contingent expenses.  Ramaji Anant was a commander of 500 horses.  He was a Sirdar under the Peshwa Government and he was liked both by the Peshwa and the Sindhia.
                    While he was in the service of Sindhia, Ramaji Anant with his tact induced the Imperial Court of Delhi to grant him Jagir Inam of Rs. 50,000.  This Jagir he was not diestined to enjoy long.  The then Peshwa Balaji Bajirav took Sonai and  Bamhni villages in the Newasa Taluka of the Ahmednagar Collectorate being a Jagir worth Rs.30,000 under the pretext of ovalni, (a gift given by a brother to his sister during the Divali holidays), for his wife who was distantly related to Rama Anant.  There thus remained three villages worth Rs.20,000.  Of these Akolner and Khedle Paramanand are now under British Government and Naogaum under the Nizam of Hyderabad having been transferred to his territory in 1820 on the settlement of boundaries.  The above mentioned villages were granted in Jagir in 1162 Fasli or 1752 A.D.
                    Ramaji Ananat was a man of charitable disposition.  He was as useful to the public as he was to government.  His expenses on charity per annum were from 20,000 to 25,000 Rs.  He made paved roads and also built a temple at Basani in the Ratnagiri District.   He constructed at Paithan a ghaut or steps to the bank of the river Godavari.  He dug and built a tank at Kedar and made several repairs to old public buildings.
                    Ramaji Anant died in 1761 leaving three sons-Appajirao, Venkatrao, alias Mhadaji, and the Third Moropant and widow Janakibai.
                    Appajirao was born in 1748 ; Venkatrao in 1751 and Moropant in 1755.
                    After the death of Ramaji Anant the three Inam villages were entered in the name of his eldest son Appajirao and the posts of Divan and Fadnis were conferred upon him by the then Peshwa and Sindhia.  Consequently Appajirao used to get the same salary as  his father, but the Bithoor Paragana granted as Saranjam Jagir of 1,20,000 Rs.  was discontinued.  Mahadaji Sindhia was then ruling at  Gwalior.
                    Appajirao spent much money in charity ; he made repairs to buildings and temples built by his father.  Seeing this, Visaji Keshav Lele, and Inamadar of basani, granted him in 1770 land in Inam and cash allowance in perpetuity.  The village of Khedle Parmanad which was formerly granted to the father of Appajirao as Jagir and subsequently attached by the Peshwa Government, was restored to Appajirao in 1790.  New sands were issued to that effect by Madhavarao Narayan Peshawa (Madhavarao II).
                    Appajirao while serving as Divan to Sindhia was slain in 1791 in the Marwar war.  At his death he was 43 years old.  He left no issue but his widow behind him named Parvatibai.
                    Venkataro alias Mahadaji Ram, the younger brother of Appajirao, also died childless before his brother in 1890.  His widow Rakhamabai survived him.
                    Moropant the youngest brother of Appajirao died also without any issue in 1785.
                    After the death of Appajirao his widow Parvatibai, with the permission of the Peshwa Government, adopted one Ramarao from the Joshi family at Basani.  The exact date of birth of Ramarao is not known. He was married two years after his adoption when he was about 11 to 12 years of age.
                    Rakhamabai, the widow of Venkatrao, being dissatisfied with this adoption obtained permission for a separate adoption on presenting a Nazar of Rs 5000/- to the peshawa government. This took place two months after the adoption of Ramrao. The name of the adopted son of Venkatrao was Narayanrao.
                    Ramrao being the representative of the elder branch of the family the Jagir and Inam were entered in his name on the death of his father Appajirao.
                    He joined his hereditary appointmet of diwan and Fadnis at the court of Sindhia. In A.D. 1795, Ramrao Appaji when 16 years of age accompanied Daulatrao Sindhia at the battle of Khadra fought between the Peshawa and Nizam.
                    While Ramrao Appaji was at Gawalior, Mahadeorao Narayan the then Peshawa died in Poona, and Bajirao Raghunath succeed him. The latter dismissed most of the old servants and confiscated their Inams and Jahagirs, and appointed new men of his own choice.  The property of Ramrao Appaji was also confiscated. Hearing of this at Gawalior, Ramrao requested Daulatrao Sindhia to favour him with a note of introduction to the Peshawa which is translated here below-
                    
"My dear Sadashivpant Bhau
                    I am glad to hear of your doing well from time to time. Their Highness the Desease Nanasaheb and Dadasaheb had confered the offices of Diwan and Fadnis on Mr.Ramchandra Mallhar with the consent of the deceased the venerable Jayappa  and Dattaji Sindhia. But that gentleman through some disagreements with my ancestors went off directly to Poona. Afterwards both their Highnesses granted the sanads to Messrs. Ramaji Anant and Laxman Keshow Vaidia, the former of whom was the grandfather of Ramrao Appaji Dabholkar. My ansestors services were rising in a very prosperus state through the good wishes of their Highness and even the Emperor was greatly satisfied with them, who on my fathers repairing to His Huzoor granted to Mr.Ramaji Anant some sanads of Inam as Saranjam of the villages of Sonai and Bamhni - worth Rs 50000/-. Ramji Anant on a visit to His Highness placed them at His Highness' feet as a tokan of respect, when His Highness was pleased to confer upon him a Saranjam of the villages of Akolner Taluk, Pade Pedgaum, Khedle Paramanand Taluka, Newasa and Naogaon Taluk Ambad as a hereditory estate instead of the two villeages above named, but keeping out of it a Saranjam worth Rs 30,000 for the venerable Bayabai ( The wife of BalajI Balajirao Peshwa).  His Highness was also pleased to grant to Mr. Laxuman Keshav the village of Tembhari in the Taluka Kalian. So these four villages were governed peaceably upto this time without a disturbance.  But I hear lately that these villages are confiscated by His Highness.
                    What I want to beg of you now is that you will kindly interfere with His Highness to relieve the villages stating that Mr. Ramji Anant has done much service in the battle of Panipat and Appajirao has done his best to profit His Highness in an expendition in Marwar; also Mr. Gopal Janardan Vaidia played a prominaent part in the battle of Jayapore. These gentlemen Ramrao Appaji and Janardan Laxuman are diligently serving His Highness. The present rebellion has involved them in debts, to clear off which the Saranjam they hold is the main stay of which His Highness is fully aware. I come short with my hearty request that you will do such thing for Mr. Ramrao Appaji that His Highness would be pleased to relieve his villages so that he will return here with gladness."
heading here
On the persual of this letter from Daulatrao Sindhia to Sadashivpant Bhau, Mankeshwar, the then Diwan to Bajirao Peshawa, restored the confiscated property including Jagir villages to Ramrao.
                    At the latter part of Peshawas, rule dacoits desolated the whole country, and shortly after the British rule was established in this part of the country, and consequently Ramrao Appaji could not return to Gwalior again. He lived for some years at Wai in the satara District where at the age of 42  he died of cholera.
                    Ramrao Appaji had two sons, one Krishnarao and other Appajirao. They were born when their father was at Karoli near Gwalior - Krishnarao, in 1812  Appajirao, in 1814.
                    At the death of his father in 1821 Krishnarao was only 9 years old. His mother also died a year after. During his minority he was naturally placed under the guardianship of his grandmother Parvatibai. The Inam and Jagir villages were entered in his name but their management rested with his Karbhari sadashiva Anant Pendase.
                    It was a stirring time, the British rule was newly established in this country and there were no regular schools; however Krishnarao studied at the private school and acquired considerable knowledge of Marathi.  He took into his hands the management of his Jagir at the age of 18.
                    During the guardianship of his grandmother a heavy debt was contracted and most of the property was in danger of being lost. Besides this there was a dispute between the British Government and the Nizam regarding the boundry settlement at that time. Naogaon, one of his Jagir villages was transfered from the British to Nizam‘s territory in 1820.
The Nizam‘s country not being properly governed then, the said village was attached several times by the officers of the Nizam and the proceeds were taken by them. In consequence of this, Krishnarao suffered much loss. However, he gradually discharged his debts and put forth his grievances before the British Government, whereupon he was restored to all his Jagirs and Inams. He improved the condition of his rayats. He built Chowries,  Dharmashalas, Schoolhouses & c, partly at his own expense, and partly by popular contributions.
                    He passed most of his life in misery and hardship and travelled through many parts of India. He was 3rd Class sirdar in the Deccan, was invested with Civil powers in 1832, and with Revenue powers in 1854.  He died at Akolner on the 4 th of May 1832 at the age of 71.
                    Krishnarao left two sons Moro Krishna and Ganpatrao Krishna. The elder Moro Krishna (the writer of this short sketch) is aged 41. The younger Ganpatrao Krishna is aged 25 and is preparing for the degree of B.A. in the Free Church College, Bombay.
                    Moro Krishna has two sons; the elder Vishnu Moreshwar aged  24 has passed the Matriculation examination and has been preparing for the higher ones. The younger is Janardhan, and is 8 years old.
                    Ganpatrao Krishna has also three sons Gangadhar, Hari, Govind.
                    The second son of Ramrao and the younger brother of Krishnarao is Appajirao who is at present at Nashik, and has determined to spend his life in performing pious deeds. He is averse to wordly cares. He has two sons; Kashinathrao aged 44, and Narayanrao aged 34. Kashinath has one son Keshav aged 5, and Narayanrao has also one Bhalchandra aged 5. 
                    Narayanrao, the adopted son of Venkatrao of the younger branch of the family died in 1812, and left behind him one son only, Balkrishnarao. He was born in 1809 and died at Poona in 1860 at the age of 51. He left a son Damodharrao behind him who is now about 50 years of the age, and lives in Poona with his two sons Narayanrao and Gopalrao.
Krishnarao Ram, as he was a descendant of Diwan Ramji Anant, was enrolled as Sirdar in 1831 when a list of Sirdars was prepared at the Poona Agency. No special Resolution was passed to that effect.
                    After his death the name of the eldest son was entered in the list of third class Sirdar under Government Resolution No. 3500, dated 22nd July 1882 of the Political Department.
                    Moro Krishna, the writer of this short sketch, is a hereditary Sirdar, and as such his name is entered in the list of Sirdars.
                    Moro Krishna enjoys no other manpans from Government except an invitation to a durbar, but there are certain manpans recieved from the peoples in his Jagir villages. He is pleader in the Ahmednagar District Court. He was invested in the jurisdiction of his Jagir villege of Akolner and Khedle, with civil powers in 1867, under Bombay regulation XIII of 1830, with Criminal powers in 1876 under criminal procedure Code, and with the Revenue powers in 1883 under section 88 of the Land Revenue Code. He exercises the same powers in his Jagir village of Naogaunm in His Highness the Nizams territory. He has been appointed a conciliator in the NagarTaluk under the deccan Agriculturists Relief Act. He was the member of  the Taluk and District Local Fund Commitee in the Ahmednagar District, and lately the Government of India have kindly conferrd upon him the title of Raosaheb as a personal distinction.

[ 12 ]
घराणे 57 वें,जोशी
    पेशवे दफ्तर    राजमंडळ    श.1672 श्रा.शु.9 
    कोकण जनरल    स्वारी राजश्री पंतप्रधान    छ.8 सु!! इहिदे
    रुमाल नंबर 650    रमजान दफाते पत्र    (खमसैन मया व अलफ)
वेदशास्त्र संपन्न राजेश्री विश्वनाथ जोशी बिन हर जोशी चिपलोणकर उपनाम काले सूत्र आश्वलायेन गोत्र वच्छ याणी हुजूर कसबे पुणे येथील मुक्कामी येऊन विनंती केली की,आपण स्नानसंध्यादि षट्कर्मे आचरोन राजश्री स्वामीस व स्वामीच्या राज्यास अभीष्ट चिंतून आहों कुटुंबवछल कुटुंबाचा योगक्षेम चालत नाही याजकरीता स्वामीनी कृपालू होऊन नूतन येक गाव इनाम करून दिल्हा पाहिजे म्हणोन त्याजवरून हे थोर सीष्ट सत्पात्र तपस्वी स्नानसंध्येचा ठाई बहुत निरत याचे चालविल्या राजश्री स्वामीस व स्वामीच्या राज्यास श्रेयस्कर जाणोन याजवर कृपालू होऊन यासी मौजे कालूंदरे प्रांत कल्याण हा गाव इनाम दरोबस्त कुलबाब कुलकानू हालीपटी व पेस्तर्पटी जलतरूपाशाणनिधी निक्षेप आदिकरून खेरीज हकदार व इनामदार दिल्हा असे तरी माौ मार वेदमुर्तीचे दुमाला करून यास व याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम चालवणे प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहुन घेऊन असलपत्र वेदमूर्ती जवळ भोगवटियास परतोन देणें म्हणोन मााा यास सनद 1
    वेदमूर्तीची नावची सनद 1
    येविसीची चिटणिसी पत्रे 2
[ 13 ]

श्री
राजा शाहु नरपति
[ शिक्क्यातील मजकुर ]                                                                                                        हर्षनिधान बाजीराव                                                                                श. 1657 भा. शु. 2ब
बल्लाळ मुख्यप्रधान
वेदशास्त्रसंपन्न राजश्री भैरव जोशी बिन हर जोशी चिपुलनकर गोत्र वत्स सुत्र आश्वलायेन स्वामीचे सेवेसी
                    सेवक बाजीराऊ बलाल प्रधान नमस्कार सुमा सीत सलासीन मया आलफ तुम्ही पुण्याचे मुक्कामी हुजुर येऊन विनंती केली की आपण राजश्री स्वामीस व स्वामीचे राज्यास आभीष्ट चिंतुन आहो कुटुंबवत्सल कुटुंबाचा योगक्षेम चालत नाही याजकरीता आपणास काही नुतन इनाम करून दिल्हा म्हणजे योगक्षेम चालेल म्हणुन विनंती केली त्यावरून मनास आणिता तुम्ही थोर ब्राह्मण वेदशास्त्रसंपन्न तुमचे चाल (व) णे आवश्यक जाणुन तुम्हास मौजे चिपले तालुका वाजे प्रांत कल्याण हा गाव नुतन इनाम कुलबाब कुलकानु जलतरूपाषाणनिधिनिक्षेप देखील हाली पटी पेस्तर पटी खेरीज इजारदार व इनामदार इनाम पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने करून दिल्हा आहे तरी तुम्ही मौजे मजकुर आपले दुमाला करून घेउन पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने इनाम आनभऊन सुखरूप राहणे छ. 1 रबिलाखर बहुत काये लहिणे.
समालोचन(प्रथम आवृत्ति -1944)
कोकणात व इतरत्र वास्तव्य  करणाऱ्या काळे कुलातील सुमारे 350 कुटुंबांची व्यक्तीशः माहिती वंशावळी आणि वृत्तांत या प्रकरणात दिली आहे.  ही माहिती काही समक्ष भेटीने व बरीचशी पत्राद्वारे गेल्या तीन वर्षात मिळवली आहे.  अनेक वेळा पत्राद्वारे विनंती केली असतानाही काही कुलबंधकडुन सविस्तर माहिती आली नाही.  त्यामुळे काही ठिकाणी माहिती अपुरी राहण्याचा संभव आहे त्यास आमचा निरुपाय आहे. या मिळालेल्या माहितीनुसार सुचणारे काही सामान्य विचार या प्रकरणात द्यावयाचे आहेत.  हे विचार मुख्यतः काळे कुलापुरतेच असले तरी सामान्यरित्या ते चित्तपावन समाजास लागू पडतील नि अंशतः त्या समाजाच्या इतिहासास उपयुक्त ठरतील असे मानण्यास प्रत्यवाय नाही.
                    आम्हास मिळालेल्या माहितीनुसार काळे कुलात आज 1290 पुरुषव्यक्ती विद्यमान आहेत, आणि त्या निरनिराळ्या 350 कुटुंबात रहात असून त्या सर्वांचा 57 घराण्यात समावेश होतो.  या 57 घराण्यपैकी 12 घराण्यात 6 पिढ्यांची, 4घराण्यात 5 पिढ्यांची नि 4 घराण्यात 4 पिढ्यांची माहिती उपलब्ध आहे.   अधिक माहिती मिळाल्यास ही 20 घराणी इतर घराण्यांत समिविष्ट होतील यात शंकाच नाही.  57 पैकी 20 घराणी कमी केल्यास काळेकुलातील 1290 व्यक्ती 37 घराण्यात विभागल्या जातात.  म्हणजे हा सर्व विस्तार 250 ते 300 वर्षांपूर्विच्या 37 निरनिराळ्या पुरुषांपासुन झालेला आहे असे म्हणता येते.  सरासरीने 25 वर्षांची पिढी मानतात, त्यावरून 350-375 वर्षार्ंची माहिती मिळाली आहे.  125 वर्षांत लोकसंख्या दुप्पट होते असे मानल्यास श.1740 मध्ये काळे पुरुषव्यक्ती 645 असाव्यात.  याप्रमाणे मागे जाता 1 पुरुष व्यक्ती असण्याचा काळ शक 1100चे सुमारास येतो व याच वेळी काळे हे उपनाव अस्तित्वात आले असेल; म्हणजे मिळाली आहे याच्या मागील आणखी सुमारे 400 वर्षांची माहिती मिळाल्यास मुळपुरुष एक दाखवण्याची कल्पना सिद्ध होईल.
                    काळे हे आडनाव हिंदू समाजात अनेक जातीत आहे.  महाराष्ट्र ब्राह्मणातील अनेक पोतजातीतही आहे.  चित्पावनात वत्स गोत्राव्यतिरिक्त इतर गोत्राचेही काळे आहेत.  पंचांगात गार्ग्य गोत्री असल्याचें, तसेंच कृष्णाजी नारायण (2-8) यांचे माहितीप्रमाणें वासिष्ठ गोत्राचेही कांही काळे असल्याचें समजतें.  आम्हांस वत्स व शाण्डिल्य या गोत्रांचे काळे आढळले.  गार्ग्य व वासिष्ठ गोत्रांचे आढळले नाहीत.  काळे हे आडनाव अनेक जातींत व पोटजातीत असल्यामुळें या पुस्तकांकरितां माहिती गोळा करतांना आम्हांस बराच प्रयास पडला व बराच पत्रव्यवहार करावा लागला.  काळे आडनाव आढळलें कीं पहिल्याने त्याची जात, पोटजात व गोत्र याची चवकशी करावी लागे.  अशा अडचणींमुळें आम्ही शक्य तो प्रयत्न केला असूनही कांही काळे व्यक्तींचा या पुस्तकांत समावेश होण्याचा राहिला असेल.  अशा व्यक्ती कोणास आढळल्यास त्यानीं आम्हांस अवश्य कळवावें  म्हणजे पुरवणी निघेल त्यावेळीं त्यांच्या माहितीचा समावेश करु.  या पुस्तकांत व्यक्ती या शब्दाचा अर्थ पुरुषव्यक्ती असा आहे.
उपनाव
  काळे या उपनावामधून जोशी, उकिडवे, काकतकर, घाटे, सोहोनी, घांग्रेकर नि दाभोळकर अशीं उपनावे निघालीं असे म्हणतात.  परंतु दाभोळकर व काही जोशी घराणीं हीच केवळ जुन्या कागदपत्रीं पुराव्यावरून काळे उपनावांतून निघाल्याचें आम्हाला सप्रमाण आढळलें, म्हणूंन आम्ही त्यांचा या पुस्तकांत समावेश केला आहे.  उकिडवे, काकतकर, घाटे, सोहोनी नि घांग्रेकर यांच्या बाबतिंत लेखी विश्वसनीय पुरावा आम्ही प्रकटरीत्या विनंती केली असतांही आम्हांस मिळाला नाही, म्हणून त्यांचा समावेश या पुस्तकांत केलेला नाही.
1. संख्या
 इ. स. 1931 मध्ये चित्तपावनांची शिरगणती सुमारे 1,40,000 होती.  स. 1941 मधील आंकडे उपलब्ध नाहीत; त्यामुळें हीच संख्या विवेचनासाठी घेणें प्राप्त आहे.  गेल्या 12 वर्षांत ही संख्या थोडी फार वाढली असेलच, म्हणजे सरासरी दीड लाख झाली असेल.  चित्तपावनांत आडनावें अंदाजी 300 असल्यामुळें एका उपनावाची स्त्रीपुरुष-संख्या सुमारें 500 व केवळ पुरुषसंख्या 250 येते.  गोखले, परांजपे, चितळे, पेंडसे, खरे, लमये, भावे, इत्यादि आडनावांची संख्या एक हजार किंवा अधिक आहे.  सरासरीच्या मानाने ही संख्या 4-5 पटींच्यावर आहे.  यावरून इतर कांही उपनावांच्या व्यक्तींची संख्या अत्यल्प आहे हे उघड आहे.  गोळे व आचवल ही आडनावें या जातिंची होत.  250च्या खालची अल्पसंख्या व 1000 च्या वरचीं बहुसंख्या असे मानिल्यास काळे यांची व्यक्तीसंख्या 1290 असल्यामुळें हे उपनाव बहुसंख्य आहे असे ठरतें.  गोत्रमालकेंत दिलेल्या 60 आडनावांत काळे हे आडनाव नाही तथापि त्यांच्या व्यक्तीसंख्येवरून हे आडनाव जुनेआं आहे हे निर्विवाद होयी
                    शिरगणतीचे आंकडे पाहिले असतां सामान्यपणें त्यांत पुरुषाइतकींच स्त्रियांची संख्या आढळते;  म्हणूंन काळे कुलांत सुमारें 1290 स्त्रिया आहेत असे समजतां येईल.  म्हणजे स्त्रीपुरुष-संख्या 2580 किंवा सरासरीने 2600 आहे.  चित्तपावनांची एकंदर संख्या दीड लक्ष असल्यामुळें प्रत्येक 57-58 व्यक्तींत एक काळे आहे असे ठरतें.  आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या चित्तपावनांच्या कुलवृत्तांतावरून (यांत काळे यांचा समावेश आहे) पहातां एकंदर या समाजाच्या एकपंचमांशाची माहिती प्रकाशित झाली आहे हे या समाजास भूषणावह व इतर समाजास मार्गदर्शक आहे.
2. व्यवसाय
या कुळांतील धंदेवारीचे आंकडे पुढे दिले आहेत.  पूर्वीं प्रसिद्ध झालेल्या वृत्तांतातून ज्या पद्धतीने आंकडे दिले आहेत ती पद्धत आम्ही अनुसरली आहे.  यामुळें समाजासंबंधी सामान्य विवेचनास ते उपयोगी पडतील.
सरकारी नोकर                111    शेतकरी, खोत,
निम सरकारी नोकर          12    इनामदार, सुखवस्तु            128
सेवानिवृत्त                        33    भिक्षुक                                  38
शिक्षक                            58    एकूण                                  166
रेल्वे नोकर                      19    डॉक्टर, वकील                       36
खसगी नोकर                 169    इतर स्वतंत्र धंदेवाले              63
व्यापारी                           50    एकूण नोकर                       402        
                      एकूण     149
मुख्य व्यवसायाच्या दृष्टीने शेंकडेवारी
व्यवसाय                                काळे                पेंडसे                खरे                लिमये                गद्रे                सोमण                चितळे
                                                717                495                623                762                    538                576                    672
नोकरी                                       56                     52                 52                 50                       55                 51                     40
स्वतंत्र व्यवसाय                         21                     21                 23                  26                     20                 19                      21
शेती                                          18                     22                 17                   20                     12                 23                     22
भिक्षुकी                                      5                      5                      8                  4                       13                  7                     17
                                            100                    100                    100            100                    100                100                    100
                    अठराव्या शतकापूर्वीं कुलांतील बहुतेक मंडळी कोकणांत शेतीवरच निर्वाह करीत.  जोडधंदा म्हणूंन थोडीशी भिक्षुकी असे.  हा जोडधंदा सहज होण्यासारखा होता, कारण बहुतेक ब्राह्मण थोडें-फार वेदाध्ययन करीत.  मराठेशाहीत-विषेशतः पेशवेकालीं-कारकूनपेशा व थोडाफार शिलेदारी पेशा आला.  तोच क्रम इंग्रजी राज्य सुरू झाल्यावर चालू राहिला.  इंग्रजी शिक्षणप्रसाराच्या वाढत्या सोयींचा उपयोग करून शिक्षण संपादण्याकडे महाराष्ट्रांतील चित्तपावनानीं इतर ज्ञातीतील लोकांपेक्षां अधिक लक्ष घातलें व आपल्या बुद्धिसामर्थ्याने विद्या संपादन करून त्या जोरावर सरकारी नोकऱ्यांत ते वर्चस्व स्थापूं शकले.  याचा परिणाम असा झाला कीं, चित्तपावनानीं इतर सर्व मार्ग सोडून नोकरी व नोकरीसाठी विद्या हे ध्येय पत्करलें.
                    अलीकडे नोकरी देण्यांत गुणांच्या ऐवजीं जातवारीचें अनिष्ट धोरण शिरल्यामुळें गुण नि बुद्धिमत्ता यांची नोकरीच्या दृष्टीने किंमत राहिली नाही.  ब्राह्मण वर्गास सरकारी नि निमसरकारी नोकरी मिळणें आतां कठिण झालें आहे व ही परिस्थिती दिवसेदिवस वाढत जाईल असे दिसत आहे.  त्यामुळें त्यानां आतां इतर व्यवसायांकडे दृष्टि वळविणें क्रमप्राप्त झालें आहे.  शेती फायदेशीर होत नाही.  धार्मिक आचार वा जुनी दानधर्माची प्रथा नष्ट होऊ लागल्यामुळें वैदिक व भिक्षुक यांचा योगक्षेम चालणें अशक्य झालें आहे.  थोडक्यांत बोलावयाचें म्हणजे सरकारी व निमसरकारी नोकरी, शेती, भिक्षुकी व सावकारी हे धंदे आतां ब्राह्मणांस निरुपयोगी ठरले आहेत.  ह्या परिस्थितीमुळें गेल्या 20-25 वर्षांत ब्राह्मणसमाज इतर व्यवसायाकडे वळूं लागला आहे.
                    नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करून निराश झाल्यावर स्वतंत्र धंद्याकडे नजर फिरविण्याऐवजीं प्रथमपासूनच स्वतंत्र व्यवसाय करावयाचा बेत करून त्यासाठी लागणारी योग्यता प्राप्त करून घेऊन हौसेने त्या कामांत पडावें हे उचित होय.  पूर्वींची पिढी असल्या व्यवसायांत नसल्यामुळें त्या पिढीच्या अनुभवाचा फायदा या पिढीस मिळणार नाही, यामुळें या नवीन मंडळींस ते ज्या धंद्यांत पडतील त्या धंद्यांत अग्रेसरत्व मिळविण्यास बराच काळ लोटावा लागेल.  या शिवाय धंदेवाईकपणाला अवश्य असणारे गुण अंगीं बाणण्याला दिवसगत होणारच.  व्यापार धंद्यांत पडलेल्यांनां सरकारी नोकरांप्रमाणें स्वास्थ्य अथवा आराम लाभत नाही, तथापि त्यांत त्यांच्या कर्तबगारीला अधिक वाव असून आपणांबरोबर इतरही कांही कुटुंबाना अन्नाला लावतां येतें हा फायदा आहे.  कालौघाबरोबर कांही व्यवसायांना तेजी व कांहिंना मंदी येते.  याकरितां भावी कालांत कोणता धंदा वाढत जाणार याचें निरीक्षण करून आपल्या उद्योगाचे सुकाणूं त्या दिशेकडे वळविण्याची दूरदृष्टि ज्याला असेल त्याचा धंदा भरभराटीला जाणार.  हा विचार धंद्यांत पडणाऱ्यांनां करणें अवश्य आहे.  या दृष्टीने काळे कुलांतील मंडळींनीं कोणती दिशा पत्करली आहे हे खाली दिलेल्या निरनिराळ्या धंद्यांत असलेल्या व्यक्तिंच्या संख्येवरून कळून येईल.  पुढील आंकड्यांत 45 वयापर्यंतचेच लोक घेतले आहेत.  त्याहून मोठ्या वयाचे लोक घेतले नाहीत याचें कारण ते जेव्हां द्रव्यार्जन करूं लागले त्या वेळीं गेल्या 20-25 वर्षंतील कष्टमय स्थिति नव्हती नि त्यामुळे त्यांस नोकरी सहज मिळूं शकली.  तशी स्थिती आतां नाही.  तेव्हां जुन्या लोकांचे धंदेवारीचे आंकडे पुढील  लोकांस मार्गदर्शक होण्यासारखे नसल्यामुळें ते दिले नाहीत. गेलीं चार वर्षें जागतिक युद्ध चालू आहे त्यामुळें बेकारीस थोडा आळा बसला असून अनेक तरुणांस युद्धोपयोगी कार्यांत तात्पुरती नोकरी मिळाली आहे;  परंतु ती नोकरी कायम स्वरूपाची नसल्यामुळें युद्धोत्तरकाळीं टिकणार नाही.  सरकारी  नोकरांचे आंकडे पाहतांना ही गोष्ट ध्यानांत ठेवावी.  तसेच खाजगी नोकर या संख्येत बेकार असावेत.  कारण बेकार सांगण्यांपेक्षां काही लोक खाजगी नोकरी असल्याचें सांगण्याचा संभव आहे.
3 शिक्षण
काळे-कुलांत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांत इतर कुलांच्या मानाने काळे कुल पुढारलेले दिसतें.  उच्च शिक्षण घेण्यास सांपत्तिक स्थिती अनुकूल लागते, तसेच वास्तव्याच्या जागीं शिक्षणाची सोय असावी लागते.  या कारणाने खेडेगांवातील मंडळींच्या मुलांपेक्षां शहरांत राहाणाऱ्यांची मुले उच्च शिक्षण जास्त घेऊ शकतात. 
                    स्त्रियांच्या शिक्षणासंबंधाने माहिती मिळविण्याचा काही प्रयत्न केला.  पुरुष व्यक्तींची माहिती जितक्या प्रमाणांत मिळाली तितक्या प्रमाणांत स्त्रियांची मिळाली नाही.  गेल्या 20-25 वर्षांत स्त्री शिक्षणाचे पाऊल विशेषतः शहरांत झपाट्याने पुढे पडत आहे.  खेड्यापाड्यातील मुली सुध्दा पोथ्या, पुस्तकें वाचण्याइतपत साक्षर झालेल्या आहेत.  ज्यांना परीक्षा उत्तिर्ण होण्याचा मान मिळाला आहे अशा सासुरवाशिणी व माहेरवाशिणी अशा पुष्कळ स्त्रियांची माहिती आम्हांस मिळाली.  त्यापैकीं कांहीं पदविधर आहेत. 
4 वसतिस्थाने
दक्षिण कानडा जिल्ह्यांत चित्तपावनांचीं निरनिराळीं 40 आडनावांचीं कुटुंबें आहेत त्यांत काळे आहेत असे चित्पावन पुस्तकांत म्हटलें आहे.  दक्षिण कानडा जिल्ह्यांत चित्तपावन पुस्तकांत म्हटलें आहे.  परंतु आम्ही तपास करितां काळे नसल्याचे कळतें.  वत्सगोत्री गोरे आहेत.  व होते व काळे हे मूळ एकाच आडनावाचे भेद आहेत असे कांही मानितात.  त्यामुळें काळे तिकडे असल्याचा उल्लेख असावा.  आम्हांस गोरे व काळे एकच असा आधार आढळला नाही.  महाराष्ट्रांतील रत्नागिरी व पुणे या जिल्ह्यांत काळ्यांची बरीच वस्ती आहे असे दिसून येईल.  जिवंत कर्त्या पुरुषव्यक्तीचें वास्तव्य ज्या गांवांमध्ये आहे.  तीं गांवें अकारादि क्रमाने ग्रामसूचि मध्ये दिलीं असून त्यांच्यापुढे व्यक्तींचा आंकडा मांडिला आहे.  कांही व्यक्तींचा गांव निश्चित समजला नाही.  अशा लोकांचा समावेश त्यांच्या मूळच्या गांवांत केला आहे.  ही वास्तव्याचीं गांवें सर्वांचीं नित्याचीं नसून व्यवसाय, विद्याभ्यास इत्यादिकांसाठी कांही व्यक्ती त्या त्या गांवीं आहेत असे समजावें.  
पुणे नि मुंबई येथे अधिक संख्या आहे.  म्हणूंन सांगितलें, पैकीं बरीच वस्ती व्यवसायानिमित्ते तात्पुरती आहे.  
5 वयोमान
 इतर कुलांतील आंकड्यांशीं तुलना करण्याकरितां शेंकडेवार आंकडेही दिले आहेत.   पूर्वीच्या मानाने अलीकडील व्यक्तीचें आयुष्यमान कमीं झालें आहे असे ऐकण्यांत येतें.  मृत माणसांच्या मृत्युसमयींच्या वयांचे आंकडे उपलब्ध असल्याशिवाय हे विधान कितपत खरें आह हे सांगतां येत नाही.  आमच्याकडे आलेल्या मिहितींत पूर्वींच्या पिढ्यांचें आयुर्मान ठरविण्यासारखी माहिती फारच थोडी आहे;  त्यामुळें त्यावर अनुमान काढणें योग्य नाही.  तथापि खेडेगांवांत शहरांपेक्षां दीर्घायुष्य जास्त आढळतें असे विधान करण्यास हरकत नाही.  काळे-कुलांतील जिवंत व्यक्तींचे सरासरीचें आजचें वयोमान 25.8 पडतें.  
6, विवाहसंबंध
 इतर घराण्यांशीं विवाहसंबंधामुळें झालेल्या सुमारें 1800 संबंधांची माहिती या पुस्तकांत आली आहे.  काळे यांचे गोत्र वत्स आहे.  सप्रवर व सगोत्र विवाह धर्मबाह्य असल्यामुळें जामदग्न्य नि वत्स गोत्र असणाऱ्यांशीं यांचे विवाहसंबंध होऊं शकत नाहीत.  या दोन गोत्रांचीं सुमारें 17 उपनावें सोडून देतां चित्तपावनातील बाकी राहिलेल्या सुमारें 280 उपनावांशीं यांचे विवाहसंबंध होणें शक्य  आहे.  उपलब्ध माहितीवरून 161 उपनावांच्या लोकांशींच यांचे संबंध झालेले दिसतात.  कांही आडनावांचे लोक अल्पसंख्य असतील किंवा काळे यांची वस्ती ज्या गांवांत आहे त्यांच्या आसपास त्या उपनावाचे लोक नसतील हे याचें कारण असावें.  अधिक संबंध आलेली उपनावे पुढे दिलीं आहेत.  ही उपनावें बहुसंख्य असावींत.  पेंडसे  खरे यांचे विवाहसंबंधांचे आंकडे पाहातां ही गोष्ट नजरेस येते.  जोशी हे उपनाव यांतून गाळलें आहे, कारण त्यांत अनेक गोत्री लोक आहेत.
    उपनाव    संख्या    उपनाव    संख्या    उपनाव    संख्या    उपनाव    संख्या
    गोखले    105        बापट    50            गाडगीळ    33        लिमये    30
    केळकर    78        फडके     46            साठे    32            सोमण    30
    आपटे    62            रानडे    42            दाते    31            करंदीकर    29
    मराठे    54            पटवर्धन    39        दामले    31         बर्वे    28
    लेले    52            भिडे    34                पाटणकर    30    मोडक    26
                    चित्तपावनांव्यतिरिक्त इतर महाराष्ट्रीय ब्राह्मणजातींतील व्यक्तींशींही कांही विवाहसंबंध झालेले आहेत.  अशीं आडनावें म्हणजे 1 विवरे; 1 साखळकर; 1 टोळे; 1 कोकीळ ही होत.  तसेच एक पुनर्विवाह झालेला आहे आणि एक सप्रवर विवाहही झालेला आढळतो. text here
7, व्यक्ती-नावें
जिवंत व्यक्तींतील बहुसंख्य पंधरा नावें खालीं देऊन त्यासमोर संख्या दिली आहे.
    नाव    संख्या        नाव     संख्या    नाव     संख्या    नाव    संख्या        
    दत्तात्रेय    64        कृष्ण    35        केशव    31        रामचंद्र    46        
    विष्णु    34        वसंत    31        नारायण    40        वासुदेव     33       
     शंकर    31        गणेश    39        अनंत    32        वामन    25       
     गोविंद    36    महादेव    32        विनायक    25
                    1290 विद्यमान व्यक्तींत निरनिराळीं 158 नावें आढळतात.  त्यापैंकीं कांहिं नावांची प्रत्येकीं एक एकच व्यक्ती आहे.;  दत्तात्रेय हे नाव या शकांतच फार लोकप्रिय झालेलें दिसतें.  या नावाच्या 64 जिवंत व्यक्ती असून जिवंत व्यक्तींच्या नावांत याचा पहिला क्रमांक आहे.  थत्ते, मोने, परांजपे नि पेंडसे या कुलांतही काळे कुलाप्रमाणें विद्यमान व्यक्तींत दत्तात्रेय या नावाने पहिला क्रमांक मिळविला आहे.  काळे हे काळभैरवाचे उपासक असतांही यांच्यांत बहिरव हे नाव क्वचितच आढळतें.  दिवसेंदिवस कांही नावें व्यवहारांतून नाहीशीं होत असून नवीन परप्रांतीय नावें ठेवण्याची आवड उत्पन्न झालेली दिसते.
8,  कुलस्वामी आणि कुलाचार 
 बहुसंख्य घराण्यानी काळभैरव हा कुलस्वामी (कुलदेवता) सांगितला आहे. काहींनी तुळजापुरची भवानी, कोल्हापुरची महालक्ष्मी, आंबे येथील जोगेश्वरी, विंध्यवासिनी-योगेश्वरी इत्यादी कुलदेवता म्हणुन सांगितल्या आहेत.  कित्येकानी ग्रामदेवता यांसच कुलदेवता म्हटले आहे. उदाहरणार्थ, पडेलचा शंकरेश्वर, नांदिवड्याचा कऱ्हाटेश्वर गुहागरचा वाडेश्वर, आजगावचा वेतोबा, बसणीचा लक्ष्मीकेशव. काळभैरवाच्या जोडीस कित्येकानी सरस्वतीही सांगितली आहे. काही महाकाळी-महासरस्वती अशी जोड्देवता काळभैरवाबरोबर सांगितली आहे. एकंदराने पाहता काळे घराण्याची कुलदेवता काळभैरव हिच होय.
                    काळभैरव हा दुय्यम दर्जाचा देव मानतात.  शंकराच्या देवळाबरोबर बहिरी, भैरव, काळभैरव या नावांच्या देवाचे देउळ असते, म्हणजे शंकरावर अवलंबुन राहणारा हा देव समजतात. काळभैरव हा पिशाच्चांचा आणि मात्रिंकाचा अधिपति असुन तो प्रसंगी शिवाच्या आज्ञेने काशी येथे राहतो.  काळभैरवाची कोणत्याही शुभप्रसंगी पुजा करीत नाहीत.  शतघ्न राक्षसाला मारण्याकरीता शंकराने काळभैरवाचा अवतार घेतला असे हरिहरेश्‍वर-माहात्म्यात आहे. काळभैरवाची पुजा नरकचतुर्दशीच्या दिवशी नागव्याने करायची वहिवाट कित्येक ठिकाणी आहे. (चित्पावन, पृ. 147). काळभैरवाची देवळे रत्नागिरी, हिंदळे, गुहागर, चिपळुण व हरेश्वर येथे आहेत. 
                    सामान्यपणे देवदिवाळीस ( मार्गषीर्श शु. 1) कुलस्वामी, ग्रामदेवता इत्यादि देवास नैवेद्य घालतात.  हे नैवेद्य बहुधा वडे-घारग्याचें असतात.  काही घराण्यात देवदिवाळीऐवजी श्रावणातील एका सोमवारी हे नैवेद्य घालण्याची चाल आहे, तर काही घराण्यात देवदिवाळी व श्रावणी सोमवार अशा दोन्ही दिवशी नैवेद्य घालण्याची चाल आहे. कित्येक घराणी देवदिवाळीच्या जोडीने कार्तिक व. 8 (काळाष्टमी) ला काळभैरवास नैवेद्य दाखवितात. व काही घराणी देवदिवाळीच्याऐवजी काळाष्टमीस नैवेद्य दाखवितात.  कोणी हुताशनी किंवा धुळवड, वर्षप्रतिपदा, विजयदशमी इत्यादि मोठ्या सणांत व मंगलकार्यात नैवेद्य दाखवितात.  ही चाल बहुतकरून कोकणातील मुळ ठिकाण सोडल्यावर रुढ झाली असावी; कारण बहुतेक कोकणात देवदिवाळीस नैवेद्य दाखविण्याची चाल आहे.
                    बोडण हा विशिष्ट आचार चित्पावनांत आहे.  त्याचा संबंध वर्धनाकडे अस्ल्यामुळें जनन व विवाह यानंतर बोडण भरण्याची चाल पुष्कळ घराण्यांत आहे.  कांही ठिकाणीं बोडण न कालवितां नुसत्या सुवासिनी भोजनास सांगतात.  बोडणाची चाल कांही घराण्यांत प्रतिवार्षिक व कांहींत एक वर्षाआड नि कांहींत नैमित्तिक आहे.  थोड्या घराण्यांत ही चाल नाही.
                    विवाहानंतर पहिलीं पांच वर्षे महालक्ष्मीचें व्रत नूतन वधूने करावयाची चाल थोड्या घराण्यांत आहे.  त्यांतही कांही ठिकाणीं स्वगृही पूजा न करितां दुसऱ्यांच्या घरीं जाऊन पूजा करितात.
अनेक घराण्यांत देवांत घंटा ठेवीत नाहीत व मुलांस वाजते अलंकार घालीत नाहीत.  अशाच तऱ्हेची चाल आडिवऱ्याचे गोरे, उकिडवे व सोहोनी या आडनावाच्या लोकांत आहे.   ही आडनावें वत्सगोत्री आहेत.  वत्स - वासरूं याच्या गळ्यांत घुंगूर बांधितात.  करंजेश्‍वरी कुलस्वामिनी आहे म्हणून करंजाचें तेल व करंजाचे फाटे न जाळणें हा जसा प्रघात कांही लोकांत आहे तसाच प्रकार वत्स गोत्र व घुंगूर न घालणें, घंटा न वाजविणें या विषयीं असेल काय ?  शाण्डिल्य-गोत्री ताम्हनकर व अत्रि गोत्री चितळे यांच्यापैकीं कांही कुटुंबांतही हा आचार आहे.  यजुर्वेदी मुदगल गोत्राच्या कुटुंबांतही ही चाल आहे.  कांही घराण्यात स्त्रियांनीं काळें वस्त्र परिधान करावयाचें नसतें.  कांही डोंगऱ्यांतही ही चाल आहे.
                    चार पांच घराण्यांत मंगलकार्यानंतर किंवा एक वर्षाआड गोंधळ घालण्याची चाल आहे.  कोंकणामध्ये गोंधळाची चाल नसल्यामुळें ही घराणीं देशावर आल्यावर त्यांनीं ही चाल घेतली असावी.
शारदीय नवरात्रांत रोज देवावर माळ बांधितात व अखंड दीप  असतो.  भोजनास उठती बसती सुवासिनी व कांही ठिकाणी ब्राह्मण व कुमारिका असतात.  थोड्या घराण्यांत एक दिवस सप्तशतीचा पाठ असतो.  कांही घराण्यांत घटस्थापना करण्याची चाल आढळते, ती बहुधा देशावर आल्यावर असावी.  नरेगल घराण्यांत देवीच्या नवरात्राऐवजीं एका शाखेंत व्यंकोबाचें व दुसरींत काळभैरवाचें नवरात्र असतें.
                    कोंकण हा गरीबांचा देश आहे.  तेथें दारिद्र्य मूर्तिमंत नांदत आहे.  चित्तपावन मूळचे कोंकणचे,  त्यामुळें त्यांचे कुलधर्म  व कुलाचार मूळचे फारच थोड्या खर्चाचे होते.  कारण भक्त तसा देव.  पुढे घाटावर-समृध्द देशांत - आलेल्या कुटुंबांत या कुलाचारांस खर्चिक वळण लागलें व नवरात्रांतील उत्सव मोठ्या प्रमाणांत होऊं लागले आहेत.
9 मूलस्थान.
   काळे यांच्या 57 घराण्यांची माहिती या पुस्तकांत आली आहे.  या सर्वांचे कांकणांत- रत्नागिरी जिल्ह्यांत - मूळ गांव कोणते हे आज निश्चित सांगण्याइतकी माहिती उपलब्ध नाही.  घराणें 13, 14, 42, 49, 50, 52, 53 व 54 या आठ घराण्यांत आपले मूळचे गांव कोणते हे माहीत नाही.  बाकी राहिलेल्या 49  घराण्यांस आपल्या मूळ गांवाची स्मृती आहे.  परंतु त्यावरून सर्व घराण्यांचें एकच गांव होतें असे ठरवितां येत नाही.  उपलब्ध माहितीवरून साधारणतः ज्ञात अशा जुन्या काळीं कोणत्या भागांत हे कुल राहात होतें हे ठरविण्याचा येथें प्रयत्न केला आहे.  3, 6, 7, 8, 17, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 29, 35, 40, 44, 47 नि 56 ह्या 18 घराण्यांचीं मूळ गांवें सध्यांच्या रत्नागिरी तालुक्यांत आहेत.  तीं- नांदिवडें, पावस, गोळप, बसणी ही होत.  घराणें 7 उपळें (ता. राजापूर) येथील  काळे कूळ नांदिवड्याचे होत.  तेथून ते गोळपाला व नंतर वाडेंपडेल, उपळें व उंडील येथें गेले.  त्यावरून घराणें  1, 2, 4, 5, 30, 31, 32  हीही बहुतकरून नांदिवडें-गोळप भागांतूनच सध्याच्या देवगड तालुक्यांत गेलीं असावीं.  कारण घराणें 1 लें, पोंभुलर्ें याचा व घराणें 7 वें उपळें, यंाचा 3 दिवसांचा सोयेर-सुतकसंबंध होता, तो 14 वर्षांपूर्वीं पिढ्या तोडल्यामुळें बंद झाला.  यावरून ही दोन्ही (1 व 7) मूळची एकच असावींत व त्यांचें मूळचें गांवही एकच म्हणजे नांदिवडें असावें.  घराणें 43 वेरं खेरशेत, यांतील मंडळींस दाभोळकर हे टोपण नाव आहे.  दाभोळकर टोपण नाव असणारें घराणें 56 वें, हे मूळ बसणीचें असल्यामुळें 43 वें घराणेंही बसणीचें म्हणजे रत्नागिरी तालुक्यांतील असलें पाहिजे.  घराणें 51 सातर्डें, यांतील मंडळीही घराणें 17 वें नांदिवडें-पालशेत, या घराण्याशीं संबंधी होत.  त्यावरून 51 वें घराणेंही मूळ नांदिवड्याचें असावें.  घराणें 23 वें गोळप- करवी, यांतील कांही काळे मंडळीसही पुराणिक-काळे म्हणतात.  या वरून घराणें 33 वें पालशेत-कल्याण, 34 पालशेत-करंजगांव व 36 वें पालशेत-कोतवडें ही घराणीं गोळपचीं म्हणजे रत्नागिरी तालुक्यांतील होत असे म्हणतां येईल.  अशा रीतीने49 घराण्यांपैकीं 30 घराणीं रत्नागिरीच्या आसपासचीं- पंचक्रोशींतील-आहेत.
                    राहीलेल्या इतर घराण्यांचे मूळ गांव विजयदुर्गच्या खाडीच्या दुतर्फा म्हणजे देवगड व राजापूर तालुक्यांतील आहेत.  ही घराणीं इतर घराण्यांप्रमाणें रत्नागिरीकडून दक्षिणेस सरकून विजयदुर्गच्या खाडीच्या आसपास वसलीं असावीं.  57 घराण्यापैंकीं 11 पिढ्या व त्यापेक्षां अधिक पिढ्या सांगणारी म्हणजे विशेष जुनी माहिती सांगणारीं अशीं 7 च घराणीं आहेत.  तीं पुढीलप्रमाणें :-
    घराणें    नाव    पिढ्या    घराणें    नाव    पिढ्या    
    21    गोळप    15                7    उपळें    13
    22    गोळप-गोवळ    12    23    गोळप -करवी    12
    17    नांदिवडें-पालशेत11    56    दाभोळकर    11
    55    हिंदळें    11    
                    यांपैंकीं पहिल्या सहा घराण्यांची मूळ गांवें म्हणजे गोळप, नांदिवडें (उपळें या घराण्याचें मूळ गांव), नि बसणी (दाभोळकर या घराण्यांचें मूळ गांव) ही तीनही गांवें रत्नागिरी तालुक्यांत आहेत.  या वरून काळ्यांची जुनी वस्ती रत्नागिरीच्या आसपास होती या अनुमानास पुष्टी मिळते.
समारोप
 उपलब्ध माहिती व त्यावरून सुचणारे कांही विचार सांगितले.  कुलवृत्तांताचे दोन विभाग आहेत; एक ऐतिहासिक व दुसरा परिचयात्मक.  ऐतिहासिक विभागांतील भूतकालीन अनुभवाचा उपयोग भविष्य काळांत व्हावयाचा असतो.  कुलवृत्तांत केवळ लोकोत्तर व्यक्तींचाच अंतर्भाव करावयाचा नसून कुळांतील सर्व लहान थोर व्यक्तींचा समावेश करावयाचा असतो याची जाणीव अद्यापि पुष्कळ लोकांस नाही असे दिसते.  कारण वृत्तांताकरितां माहिती मागावयास गेलें असतां आम्ही विशेष कांही केलें नाही म्हणून पुष्क्ळ लोक माहिती देण्याचें नाकारितात.  या लोकांच्या ध्यानांत येतनाही कीं, लोकोत्तर व्यक्तींचीं चरित्रें त्या त्या कुलांचा कुलवृत्तांत होईपर्यंत अप्रसिद्ध राहात नाहीत;  स्वतंत्ररीत्या पूर्वींच प्रसिद्ध होत असतात.  न्यायुमूर्ति रानडे, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सेनापति बापट, स्वातंत्र्यवीर सावरकर इत्यादि थोर व्य्क्तींचीं चरित्रें रानडे, टिळक, गांधी, बापट व सावरकर कुलवृत्तांत  प्रसिद्ध होण्याच्या अगोदरच प्रसिद्ध झालीं आहेत.  तेव्हां  अशा  थोर व्यक्तींचीं चरित्रें कुलवृत्तांतासारख्या पुस्तकांत संपूर्ण वाचण्याची कोणीही अपेक्षा करूं नये.  तथापि लहान प्रमाणांत कां होईना अनुकरणीय गुणांच्या व्यक्ती सामान्य समजल्या जाणाऱ्या लोकांतही अनेक आढळतील.  अद्वितीय पुरुषाचें अनुकरण आपल्यासारख्या सामान्य माणसाच्याने होणार नाही या समजुतीने पुष्कळ लोक त्या व्यंक्तींचा आदर्श आपल्यापुढे ठेवीत नाहीत.  आपल्या सारख्या सामान्य माणसांनीं कांही अनुकरणीय गुण दाखविले आहेत.  असे ध्यानांत आल्यास लोक त्यांचें अनुकरण सहज करितात असा या संग्रहीत केलेल्या माहितीचा उपयोग आहे.
                    परिचयात्मक विभाग हा वर्तमानकालीन असल्यामुळें त्याचा उपयोग सद्यस्थितींत कसा क्रावयाचा याचा अवश्य विचार केला पाहिजे.  या पुस्तकाणंतील माहितीवरून काळे कुलांतील कोण कोठें असतो, काय व्यवसाय करितो हे कुलबंधूंच्या ध्यानीं येईल.  या माहितीचा उपयोग सहकार्य करण्याच्या कामीं झाल्यास ती एकत्रित क्रण्याचें सार्थक झालें असे म्हणतां येईल.  आपल्या संपत्तीचा विनियोग-- निदान कांही भागाचा तरी-- आपल्या कुलबंधूंना होईल असे धोरण धनिकंनीं ठेविल्यास कुलाचे उन्नतीला साहाय्य होईल.  पुणे येथील आनंदाश्रमाचे संस्थापक महादेव चिमणाजी आपटे, धारवाडचे रावजी बाळाजी करंदीकर, आणि पुण्याचे कृष्णाजी भास्कर चितळे यांनीं या मार्गाचें अवलंबन करून कुलाच्या उन्नतीस साहाय्य केलें आणि आपलें  नाव अजरामर करून ठेविलें आहे.  नुकताच श्रीयुत गोविंद वासुदेव भावे, संपादक भावे-कुल-वृत्तांत पुणे, यांचे खटपटीने भावे शिक्षण-निधी स्थापन झाला आहे.   त्यांतून भावे कुलांतील कर्तृत्ववान विद्यार्थ्यांस साह्य होणार आहे.  हाही याच दिशेचा प्रयत्न आहे.
                    यासंबंधात आम्हांस जे विचार सुचले  ते दिग्दर्शित केले आहेत.  इतरांस दुसऱ्याही कल्प्ना सुचतील.  परंतु सर्वांचा हेतु एकच असणार किं, कुलबंधूत परस्पर परिचय वाढावा, आपलेपणा यावा, एकमेकांचा एकमेकांस अधिक उपयोग व्हावा नि कुलाचें संघटन व्हावें.  या दिशेने या पुस्तकाचा अंशतः जरी कांही उपयोग झाला तरी आमचे श्रमांस योग्य फलप्राप्ति झाली असे आम्हास वाटेल.  अशी बुद्धि सर्व कुलबंधूस जगच्चालकाने द्यावी अशी नम्र प्रार्थना करून हे प्रकरण पुरें करितों.