कुलवृत्तान्त बघण्यासाठी मर्गदर्शिका
प्रथम मुख्य पुष्टा वरील वंशवळ व व्यक्ती ह्या बट्न वर क्लिक करा.
ELESCHER8.0 सोफ़्ट्वेअर
a) व्यक्तीच्या स्वत:च्या नावाचे (मराठीतील) आद्याक्षर (स्क्रीनवरील अ ते ज्ञ यादीतून तुम्ही ते सहज निवडूं शकता)
b) व्यक्तीच्या वडिलांच्या नावाचे (मराठीतील) आद्याक्षर (स्क्रीनवरील अ ते ज्ञ यादीतून तुम्ही ते सहज निवडूं शकता)
c) व्यक्ती पुरूष, कीं स्त्री-माहेरवाशीण, कीं स्त्री-सासुरवाशीण हें माउसचा बाण योग्य तेथे नेऊन क्लिक करून ठरवितां येते.
d) व्यक्तीचे कुलवृत्तान्ताप्रमाणे घराणे व उपघराणे (स्क्रीनवर सर्व घराणी-व-उपघराणी याची यादी दिसते, त्यातून निवडता येते).
e) व्यक्तीचें अंदाजे जन्मवर्ष (संगणक 10 वर्षे मागे व पुढे शोधतो) -मात्र तें कुलवृत्तान्तामध्ये अगोदर नोंदविलेले असले पाहिजे. यातील 5 पैकीं 2-3 मुद्दयांची माहिती दिली तरी पुरे होते, कारण येणाऱ्या छोट्याशा यादीतून तुम्ही सहज निर्णय घेऊं शकता. पाहिजे ती व्यक्ती निवडल्यावर दिसणारी ओळ वाचून खात्री करून घ्या आणि 'पुढे जा' या बटणावर क्लिक करा कीं झाले; एका सेकंदांत तुमच्यासमोर ती व्यक्ती 'मुख्य स्थानीं' धरून येणारा वंशावळीचा स्क्रीन येईल.
त्या स्क्रीनवर काय दिसते हें खाली लिहिलेले आहे.
a] काळे कुलातील सर्व विवाहित पुरूष (पिढी, जन्मवर्ष व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत
b] काळे कुलातील सर्व अविवाहित पुरूष (पिढी, जन्मवर्ष व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत
c] काळे कुलातील सर्व सासुरवाशिणी [विवाहानंतर काळे झालेल्या] (माहेरचे आडनाव, सध्याची पिढी व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत
d] काळे कुलातील सर्व माहेरवाशिणी [विवाहापूर्वी काळे असलेल्या] (सासरचे आडनाव, पूर्वाश्रमीची पिढी व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत
e] काळे कुलातील सर्व अविवाहित मुली (पिढी, जन्मवर्ष व घराण्यानुसार वर्गवारी करून) यादी स्वरूपांत