आवाहन ..
दि.15-8-16च्या मॅसेज प्रमाणे सर्व काळे कुलबंधूंना कळविणेंत येते की, आपल्या www.kalekulvruttant.com चे Domain name renewation फीचे ₹.३५००\- ५वर्षांसाठी श्री. उदय काळे, निगडी-पुणे यांनी भरून सध्या वेबसाइट सूरू केली आहे. परंतु सप्टेंबर 2016 पासूनचे होस्टींग चे भाडे भरणे अनिवार्य आहे. ते भाडे १२० महिन्यांसाठी रू.२१,०००\-+ ७,५००\- १०वर्षांसाठी Domain name renewal भाडे असे एकूण २८,५००\-जमा होणे अनिवार्य आहे. प्रत्येकाने स्वतःचे कॉन्ट्रीब्युशन म्हणून कमितकमी ₹.१०००\- प्रमाणे दिल्यास कोणा एकावर भार न पडतां प्रश्न सुटेल. जादा रक्कम जमा झाल्यास ती बँक खात्यावर राहून भविष्यात उपयोगी पडेल. तरी सर्वांनी हातभार लावावा. धन्यवाद!
Bank of Baroda, Ratnagiri.
IFSC Code - BARBOMAHRAT.
MICR Code , 415012051
A/c. Holder - Kale Kulvruttant Nutanikaran Samiti,Ratnagiri.
A/c. No. - 10130100005543.
--- गोविंद काळे. रत्नागिरी. .
आपला विश्वासू
श्री. गोविंद महादेव काळे, रत्नागिरी
govindkalekul@gmail.com
फक्त वत्सगोत्री काळे, जोशी व दाभोलकर कुलबंधुं साठी....
सर्व काळे कुलबंधुं मध्ये समन्वय रहाण्यासाठी " kale kulabandhu" असा WhatsApp वर ग्रुप केला आहे. तरी आपला WhatsApp अकाऊंट असलेला मोबाईल नंबर 9881773115 SMS करा किंवा या मोबाईलवर फोन करून सांगा. म्हणजे आपल्याला काळे कुलबंधु ग्रुप मध्ये समाविष्ट करतां येईल. आभारी आहे.
आपला विश्वासू
श्री. गोविंद महादेव काळे, रत्नागिरी
govindkalekul@gmail.com
आपला विश्वासू
श्री. गोविंद महादेव काळे, रत्नागिरी
govindkalekul@gmail.com
कै. अनंत रामकृष्ण काळे, मु. पो.उंडील, जि.सिंधुदुर्ग. य़ांचे स्नेही माननीय श्री. नरेन्द्र जी मोदी भावी पंतप्रधान यांच्या नेतृत्वाखालील भा.ज.पी. ला 2014 च्या सार्वत्रिक निवडनुकीत मिळालेल्या घवघवीत यशा बद्दल काळे कुलातर्फ़े हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा.
आपला विश्वासू
श्री. गोविंद महादेव काळे, रत्नागिरी
govindkalekul@gmail.com
कै. अनंत रामकृष्ण काळे, मु. पो.उंडील, जि.सिंधुदुर्ग. य़ांचे स्नेही माननीय श्री. नरेन्द्र जी मोदी यांची भारतच्या भावी पंतप्रधान पदासाठी निवड झाल्या बद्दल काळे कुलातर्फ़े हार्दीक अभिनंदन व शुभेच्छा.
आपला विश्वासू
श्री. गोविंद महादेव काळे, रत्नागिरी
govindkalekul@gmail.com
रत्नागिरी दि. 9 सप्टेंबर, 2013 (गणेश चतुर्थी)
प्रिय कुलबंधुनो, आज रोजी आपल्या सर्वांच्या इच्छेप्रमाणे व आशिर्वादाने आपल्या काळे-जोशी-दाभोलकर (वत्सगोत्री) kalekulvruttant.com या वेबसाईटचे काम पूर्ण झाले असून आतां श्री. उदय भगवंत काळे, निगडी-पुणें यांच्या सहकार्याने kalekulvruttant.com या वेब पत्त्यावर आपली स्वतंत्र वेब साईट सुरु झालेली आहे. तरी सर्व कुलबंधुंनी याचा लाभ घेऊन आप-आपल्या वंशातील व्यक्तिंची माहिती त्यांतील फॉर्म वर भरून पाठवावी. ही नम्र विनंती.
आपला विश्वासू
श्री. गोविंद महादेव काळे, रत्नागिरी
govindkalekul@gmail.com
(कृपया दि. 9 सप्टेंबर, 2011 रोजी सर्वांनां पाठविलेले निवेदन पुन्हा वाचावें)
हे वेबसाईटचे काम करतां करतां आपल्याकुटुंबाची माहिती अद्ययावत झाल्यास त्या साठी वेगळा खर्च वा वेगळा वेळ वाया घालवावा लागणार नाही. तरी हे निवेदन वाचल्यावर आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची माहिती (सन 2000 पासून आज अखेर पर्यंत) वेबसाईटवर दिलेल्या फॉर्म प्रमाणे भरुन ताबडतोब पाठवावी. तसेच हे काम करण्यासाठी साधारण रु. 1,50,000/- खर्च येणार असून आपणांकडून सदिच्छा देणगी स्वरुपांत मिळाल्यास कोणा एकट्यावर बोजा पडणार नाहीं. हे आपणांस माहित आहेच. संकल्पित कामाचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन होणेसाठीं काळे कुलवृत्तांत नूतनीकरण समिती गठीत केलेली आहेच. आपण पाठविणार असलेली सदिच्छा देणगी कोणत्याही राष्ट्रियकृत बैंकेच्या डी. डी. ने/ एम. टी.ने बॅंक ऑफ बडोदा, रत्नागिरी शाखा, खाते क्र. 10130100005543 मध्यें अथवा मनिऑर्डरने अध्यक्ष, काळे कुलवृत्तांत नूतनीकरण समिती, रत्नागिरी च्या नांवे द्वारा श्री. शशिकांत नारायण काळे, 3012, टिळक आळी, रत्नागिरी-415 612 या पत्त्यावर पाठवावी. आत्ता पर्यंत जमा रकमेचा हिशेब नंतर प्रसिध्द करण्यांत येणार आहे.
वेबसाईटवर आपली माहिती पाहिल्यावर ज्यांच्या माहितीत काहीं त्रुटी असल्याचे लक्षांत आल्यास तेही ईमेलने/पत्राद्वारे कळवावे. म्हणजे त्याप्रमाणे बदल करतां येईल. ज्यांना फोटो दिसावा अशी इच्छा असेल त्यांनी तो फोटो स्कॅन करून ईमेलला जोडून पाठवावा. मात्र तो फोटो कुणाचा आहे हे नीट कळण्या करीतां संपूर्ण नांव त्याच्या फाईलनेम मध्ये लिहावे. (उदा. govind_mahadeo_kale.jpg) कुणाला आपला फोटो पाठवावयाचा असल्यास मात्र त्याला रु. 100/- वेगळा आकार पडेल. ती रक्कम मिळाल्यावरच तो फोटो आपल्या नावासमोर "फोटो पहा" या नवीन विंडोमध्ये ठेवण्यांत येईल.
माहिती संकलन व तदनुषंगीक होणा-या खर्चाप्रित्यर्थ ज्या कुलबंधुंनां स्वेच्छेनें सढळ हस्ते देणगी स्वरुपांत सहाय्य करावयाचे असेल त्यांनीं वरिल पत्त्यावर पाठवून या कामी सहकार्य करावें. अशा सदिच्छा देणगी रुपाने केलेल्या मदतीची दखल घेऊन त्या दात्यांची नांवें आपल्या बेबसाईटवर प्रसिध्द करणेंत येतील.
आपणांस कल्पना असेलच की, जवळ जवळ 60 वर्षांच्या प्रदिर्घ कालावधीनंतर आपल्या कुलवृत्तांताचे नूतनीकरणाचें कार्य पुर्णत्वास गेले. ही बाब आपणां सर्वांनांच भुषणावह असून त्याची ग्रंथरुपाने आठवण म्हणून आपल्या जवळ राहावी अशी प्रत्येकाची तळमळ होतीच. परंतु आता प्रसारमाध्यमातून आपल्या घरांत किंवा इतर कोठेही जेथे जेथे इंटरनेट आहे, तेथे तेथे आपण आपल्या कुलाचा इतिहास अथवा आपल्या कुलासंबंधी माहिती आपण पाहू शकणार आहोत. तरीं सदर कार्याला आपला हातभार प्रार्थनीय आहे. तसेच ज्यांनी अद्याप या साईटला भेट दिली नसेल त्यांनीं या वेब साईटला भेट द्यावी व आपल्या कुटुंबाची माहिती भरावी . हे निवेदन आपण आपल्या कुलातील सर्वांना सांगून जास्तीत जास्त लवकर माहितीचा वेबसाईटवर फॉर्म पाठवून सहकार्य करावे. तसेच प्रत्येक पत्रव्यवहार इमेल द्वारे केल्यास बरें होईल.
कळावें ही विनंती.
आपला कृपाभिलाषी.
श्री. गोविंद महादेव काळे, अध्यक्ष.
रत्नागिरी दि. 16 ऑगस्ट, 2012
सुचना
काळे-जोशी-दाभोलकर (वत्सगोत्री) कुलाची वेबसाईट वरील आपली माहिती पहात असतांना किंवा भरतांना कांही त्रुटी अथवा चूका किंवा शंका भासल्यास माझेशीं संपर्क साधावा. एवढे काम करत असतांना चुका होण्याची शक्यता आहे. कृपया प्रत्येकाने आपला पूर्ण पत्ता, फोन नंबर, मोबाईल नंबर, e-mail ID तसेच पूर्ण माहिती आपल्या माहितीच्या फॉर्म मध्ये भरून माझेकडे पाठवावी..
गोविंद महादेव काळे
रत्नागिरी दि. 15 ऑगस्ट, 2012
खुशखबर
काळे-जोशी-दाभोलकर (वत्सगोत्री ) कुलवृत्तांत सध्या kulavruttant.com या वेबसाईटवर प्रसारीत केला आहे. हे आपणांस माहित असेलच. आत्तां पर्यंत 27 व्या घराण्यापर्यंतच्या व्यक्तिंची माहिती कुलवृत्तांत द्वितिय आवृत्ती 2003 प्रमाणें भरलेली आहे. त्या पुढील माहिती वेबसाईटवर दिलेल्या सुचनांचे पालन करुन आपल्या कुटुंबाची माहिती आपण फॉर्मद्वारे आमचेकडे कळवावी. पुढिल घराण्यांतील व्यक्तिंची माहिती भरण्याचे काम प्रगती पथावर असून लवकरच ते पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
गोविंद महादेव काळे
मोबाईल नं. 9422430863
फोन नं. (02352) 230620