काळे कुलवृत्तान्त

Site Hit 20081

         
       
- वत्सगोत्री काळे - जोशी - दाभोळकर -
- या उपक्रमाची प्रस्तावना-


'कुलवृत्तान्त' म्हणजे 'पुस्तक' ही कल्पना पूर्वीच्या सर्व पिढ्यांमध्ये (निदान छापण्याच्या कलेचा शोध लागल्यापासून) अस्तित्त्वांत होती; या पार्श्व्भूमीवर 'वेबवर डेटाबेस कशाला?' हा प्रश्न काही जणांना कदाचित् पडला असेल. उत्तर खरे म्हणजे प्रश्नांतच दडलेले आहे. मुद्रण-कलेचा शोध तसा अलीकडला म्हणजे हा फारतर 300-400 वर्षांपूर्वीं लागलेला आहे. त्याअगोदर ताम्रपटावर, दगडावर, भिंतीवर, अशा अनेक ठिकाणीं मारतीय, चिनी, इजिप्तशियन अशा प्राचीन संस्कृतींतील इतिहासातील घटना नोंदविलेल्या होत्या- कारण उघड आहे - त्यावेळीं जे माध्यम उपलब्ध होते त्याचा वापर होत गेला. अती-प्राचीन काळापासून कोणतेही माध्यम उपलब्ध नसल्यामुळे 'वेद' हे पिढ्यान्‍ पिढ्या मुखोद्गत स्वरूपांत जतन केले गेले. सारांश काय, त्यावेळीं जें माध्यम सहज उपलब्ध झाले, त्याचा वापर होत गेला. कोणत्याही कुलवृत्तान्ताची पूर्वीची आवृत्ती प्रकशित झाली तेव्हां (इ.स. 1980 च्या सुमारास किंवा त्यापूर्वी) 'इंटरनेट' उपलब्धच नव्हते, मुद्रण हेंच एकमेव माध्यम उपलब्ध असल्यानें, तो छापायलाच लागत होता. आज 21 व्या शतकांत परिस्थिती बदलली आहे, इंटरनेट जगभर (अगदी भारतांत सुद्धा खेडोपाडी) पोहोचलेले आहे आणि आज वेबवर डेटाबेस करून कुलवृत्तान्त करणें, हें तो छापण्यापेक्षां स्वस्त झालेले आहे. कुलवृत्तान्त 'वेब-डेटाबेस' स्वरूपांत करण्याचें 'स्वस्त' हें एकमेव कारण नाहीं. हा परिच्छेद वाचल्यावर तुमच्या द्यानांत येईल कीं हें 'स्वस्त आणि मस्त' आहे.
 
::: बातम्या :::

 

 
Copyright@kalekulvruttant.com | Designed By: Himanshu Enterprises